मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची घोषणा : पर्यटन विकासासाठी आयोजनावर भर
प्रतिनिधी / पणजी
भारताची पर्यटन राजधानी म्हणून गोवा राज्याकडे पाहिले जाते. आजपासून राज्यात भरविण्यात आलेल्या होप 2023 एचव्हीएस अॅनारॉकद्वारे होप या परिषदेमुळे राज्याला पर्यटनदृष्ट्या अधिक लाभ होणार आहे. म्हणून यापुढे ट्रॅव्हल व पर्यटन क्षेत्राच्या विकासासाठी दरवर्षी ‘होप 2023 बाय एचव्हीएस अॅनारॉकला’ हा मेळावा भरविण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केली.
भारतातील खास हॉस्पिटॅलिटी परिषद म्हणून ओळखल्या जाणाऱ्या होप 2023 बाय एचव्हीएस अॅनारॉकला ह्या मेळाव्याला आजपासून (गुऊवारी) गोवा येथील ताज रिसॉर्ट अँड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये प्रारंभ केल्यानंतर प्रमुख पाहुणे म्हणून मुख्यमंत्री सावंत बोलत होते. या परिषदेमध्ये हॉस्पिटॅलिटी आणि ट्रॅव्हल सेवा क्षेत्रातील 300 ते 350 निमंत्रित प्रतिनिधी, देशातील तसेच आंतरराष्ट्रीय हॉटेल व्यावसायिकांचे मालक, चालक, गुंतवणूकदार, ट्रॅवल गुरू असे व्यावसायिक सहभागी झाले आहेत.
मुख्यमंत्री सावंत म्हणाले, जगातील हॉस्पिटॅलिटी क्षेत्रातील प्रमुख केंद्र म्हणून भारताचे जागतिक स्थान अधिक ठळक करत होप (हॉस्पिटॅलिटी ओव्हरव्ह्यू प्रेझेन्टेशन अँड एक्स्चेंज)च्या माध्यमातून भारतासह जगभरातील हॉस्पटॅलिटी क्षेत्रातील नामांकित प्रतिनिधी गोव्यात एकत्र आले आहेत. या दोन दिवसीय उपक्रमात या क्षेत्रातील माहितीचे आदानप्रदान करण्याबरोबरच यशाचे आनंदसोहळे साजरे करण्याबरोबरच नवे व्यावसायिक संबंधांना प्रोत्साहन दिले जात आहे. गोव्यामध्ये प्रथमच अशा प्रकारच्या उपक्रम आयोजित करण्यात आला असून, ह उपक्रम आता दरवर्षी आयोजित केला जाईल, असे मुख्यमंत्री सावंत यांनी सांगितले.
पहिल्या दिवशी बीचसाइड चॅट कार्यक्रमात एचव्हीएस अॅनारॉकचे अध्यक्ष मनदीप लांबा यांनी जगातील हॉस्पिटॅलिटी क्षेत्रातील एक प्रमुख व लोकप्रिय जागतिक नेतृत्व म्हणून ओळख असलेले तसेच जगातील सर्वांत मोठ्या प्रमुख तीन हॉस्पिटॅलिटी कंपनीपैकी एक असलेल्या आणि 123 देशांमध्ये 7000 प्रॉपर्टीचे जाळे असलेल्या हिल्टनचे अध्यक्ष व सीईओ ख्रिस्तोफर जे. नासेटा यांच्याशी संवाद साधला. या संवादादरम्यान श्री. ख्रिस्तोफर यांनी कोविड-19 जागतिक महामारीने ट्रॅव्हल तसेच पर्यटन क्षेत्रावर झालेला परिणाम व प्रभाव यावर भाष्य केले.
पहिल्या दिवशी झालेल्या चार परिसंवाद कार्यक्रमांत ग्लोबल लीडर्स पॅनेलसह (जागतिक पर्यटन क्षेत्राची दिशा- आपण अधिक सक्षम आणि आशावादी झालो आहोत?) ग्लोबल हॉस्पिटॅलिटी अलायन्सचे सीईओ ख्रिस्तोफर हार्टले, व्यान्डहॅम हॉटेल्स अँड रिसॉर्ट्सचे अध्यक्ष (युरोप, मध्य-पूर्व, युरेशिया आणि आफ्रिका विभाग) दिमित्रीस मॅनिकिस, रेडिसन हॉटेल ग्रुपचे चेअरमन एमिरेटस आणि मुख्य सल्लागार (दक्षिण अशिया) के.बी. काचरू, एचव्हीएसचे अध्यक्ष आणि सीईओ स्टीफन रशमोर ज्यु. आणि जनरल हॉटेल मॅनेजमेंट प्रा. लि.चे सीईओ टॉमी लाई यांचा समावेश होता. या सत्राचे संचलन एचव्हीएस अॅनारॉकचे अध्यक्ष (दक्षिण अशिया) मनदीप लांबा यांनी केले.
लक्झरी ट्रॅव्हल पॅनल (जागतिक महामारीनंतर लक्झरी ट्रॅव्हल क्षेत्र वेगाने भरारी घेईल? वेगाने बदलणारी ग्राहकांची मानसिकता व अपेक्षा यामुळे लक्झरी ट्रॅव्हल क्षेत्र नव्याने परिभाषित होईल?)मध्ये एकॉरचे मुख्य विकास अधिकारी (भारत, मध्यपूर्व, आफ्रिका आणि तुर्केई) लॉर मोरवान, गोस्टेलो रिपोर्टचे ग्लोबल अम्बेसिडर, पर्यटन लेखक आणि इन्फ्ल?एन्सर मॅरी गोस्टेलो, आयएचसीएलचे कार्यकारी उपाध्यक्ष (ऑपरेशन्स- उत्तर व पश्चिम भारत) रोहित खोसला, कॉन्ड? नॅस्ट ट्रॅवलर इइंडियाचे संपादकीय प्रमुख सलिल देशपांडे, ओबेरॉय हॉटेल्स अँड रिसॉर्ट्सचे कार्यकारी उपाध्यक्ष-स्ट्रॅटेजिक डेवलपमेंट समीर नायर यांचा सहभाग राहिला.
या परिसंवादानंतर बीचसाइड चॅट उपक्रमात भारत देश कसा पर्यटन करतो या विषयावर पॅपा एडवायजरीचे सीईओ व संचालक कपिल कौल यांच्या समवेत मेकमायट्रिपचे सहसंस्थापक व ग्रुप सीईओ राजेश मेगोव यांनी संवास साधला. एचव्हीएच अॅनारॉकचे वरिष्ठ उपाध्यक्ष (असेट मॅनेजमेंट) अजय मेहतानी यांनी सूत्रसंचालन केले.
उद्योगक्षेत्रासाठी दिशादर्शन उपयुक्त
पहिल्या दिवसाच्या कार्यक्रमांबाबत एचव्हीएस अॅनारॉकचे अध्यक्ष (दक्षिण अशिया) मनदीप लांबा म्हणाले, मोठ मोठ्या अपेक्षा ठेवून या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेस जगभारतील हॉस्पिटॅलिटी क्षेत्रातील दिग्गज प्रतिनिधींचा सहभाग आनंददायी ठरत आहे. पहिल्या दिवसाच्या विविध चर्चासत्रांमधून या उद्योगक्षेत्रास नव्या दिशादर्शनासाठी उपयुक्त नव्या विचारांचे संचित नक्कीच मिळाले आहे.