पेडणे / प्रतिनिधी
पेडणे पोलीस पथक उपनिरीक्षक विवेक हळणकर यांच्या नेतृत्वाखाली पेट्रोलिंग करत असताना 27 रोजी पोरस्कडे या चेक नाक्मयावर चार चाकी वाहन क्रमांक एम. एच .0 4बी डब्लू 9235 या वाहनांमध्ये ऑफिसर चॅईस विस्की 384 बॉटल प्रत्येक बॉटल 180स्त् त्याची किंमत 17011 रुपये रॉयल राम 624 बॉटल 180स्त् वर प्रत्येक बॉटल त्याची किंमत 12480 रुपये आणि रॉयल ब्रँड 48 बोटल 180स्त् तर त्याची किंमत 1248 मिळून एकूण तीस हजार 739 रुपयांची पेडणे पोलिसांनी चोरटी दारू जप्त केली.
वाहन चालक रोहित दत्ता साळगावकर कुळगाव भोम सावंतवाडी सिंधुदुर्ग येथील असून त्यांना ताब्यात घेऊन पेडणे अबकारी आधिकाऱयांकडे दिले असून पुढील कारवाई अबकारी विभाग करत आहेत असल्याची माहिती पेडणे पोलिसांनी दिली.