दलित संघर्ष समितीची मागणी : जिल्हाधिकाऱयांना निवेदन
प्रतिनिधी /बेळगाव
शालेय पुस्तकांमध्ये चुकीचा उल्लेख केला जात आहे. या तक्रारी वाढल्या आहेत. आता दहावी आणि बारावीच्या अभ्यासक्रमामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे घटनेचे शिल्पकार नव्हते, असा उल्लेख करून त्यांचा अवमान केला आहे. त्याचा आम्ही निषेध करत असून रोहित चक्रवर्ती यांचादेखील निषेध दलित संघर्ष समितीच्यावतीने करण्यात आला आहे.
जिल्हाधिकाऱयांना निवेदन देऊन पाठय़पुस्तकांमधील चुकांमध्ये सुधारणा कराव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे. महापुरुषांचा अवमान केला जात आहे. विद्यार्थ्यांना चुकीचा इतिहास सांगितला जात आहे. केवळ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबतच नाही तर कुवेंपू, महात्मा बसवेश्वर यांच्याबद्दलही चुकीची माहिती देण्यात आली आहे. हे अत्यंत गंभीर आहे. तेंव्हा याबाबत सरकारने गांभीर्याने विचार करावा, असे या निवेदनात म्हटले आहे.
यावेळी दलित संघर्ष समितीचे जिल्हाध्यक्ष गुंडू तळवार, गिऱयाप्पा कोलकार, मनोहर मुचंडी, बाबासाहेब तळवार, सुशिल हुल्लोळी, जोतिबा तळवार, श्रीकांत शिंगे, आनंद शिंगे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.