आंतरमहाविद्यालयीन महिलांची थ्रो बॉल स्पर्धा : अंतिम लढतीत केएलई उपविजेतेपदाचा मानकरी
क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
एसजीबीआयटी तांत्रिक महाविद्यालय आयोजित व्हीटीयू चषक आंतर महाविद्यालयीन मुलींच्या थ्रोबॉल स्पर्धेच्या अंतिम सामन्यात व्हीडीआयटी हल्याळ संघाने केएलई संघाचा 2-1 असा पराभव करून व्हीटीयू थ्रोबॉल चषक पटकाविला.
एसजीबीआयटी, एस. जी. बाळेकुंद्री तांत्रिक महाविद्यालय आयोजित व्हीटीयू चषक मुलींच्या थ्रोबॉल स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात केएलएस जीआयटी महाविद्यालयाने जैन महाविद्यालयाचा 21-15, 21-16 असा पराभव केला.
दुसऱया सामन्यात केएलई महाविद्यालयाने एसजीबीआयटी संघाचा 21-19, 21-17, तिसऱया सामन्यात व्हीडीआयटी हल्याळ संघाने एआयटीएम अंगडी महाविद्यालय संघाचा 21-14, 21-18, चौथ्या सामन्यात एसकेएस लक्ष्मेश्वर संघाने एसएनडी संघाचा 21-17, 17-21, 15-12 असा पराभव केला. केएलएस जीआयटी, हल्याळ, केएलई व लक्ष्मेश्वर संघाने उपांत्य फेरीत प्रवेश केला.
पहिल्या उपांत्य फेरीत केएलई संघाने लक्ष्मेश्वर संघाचा 21-18, 17-21, 15-12 तर दुसऱया उपांत्य सामन्यात व्हीडीआयटी हल्याळ संघाने जीआयटी संघाचा 21-19, 17-21, 18-16 असा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला.
क्हीडीआयटीची बाजी
अंतिम सामन्यात व्हीडीआयटी हल्याळ संघाने केएलई संघाचा 21-19, 21-15 असा पराभव करून विजेतेपद पटकाविले.
बक्षीस वितरण प्रसंगी प्रमुख पाहुणे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. आर. पटगुंडी, स्पर्धेचे समन्वयक प्रा. आनंद बनकड, क्रीडा प्राध्यापक विजय अरळीमट्टी आदी मान्यवरांच्या हस्ते विजेत्या व्हीडीआयटी हल्याळ व उपविजेत्या केएलई बेळगाव संघाला चषक व प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले.
यावेळी हल्याळ संघाचे क्रीडा प्राध्यापक गदग्याप्पा येळ्ळूर, केएलईचे जयदेव एच., क्रांती रेडेकर, आर. एस. धमुणे आदी उपस्थित होते.
या स्पर्धेसाठी पंच म्हणून शंकर कोलकार, राजू चौगुले, उमेश मजुकर यांनी काम पाहिले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी एस. जी. बाळेकुंद्री महाविद्यालयाचे प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले.