प्रतिनिधी /म्हापसा
वेरे-बार्देश येथील मराठी-कोकणी साहित्यिक शीतल साळगावकर यांच्या दोन पुस्तकांचे प्रकाशन कोकण मराठी परिषद, गोवातर्फे शनिवारी दि. 16 रोजी दु. 3.30 वा. होणार आहे.
पणजी येथे गोमंतक साहित्य सेवक मंडळाच्या सभागृहात होणाऱया या कार्यक्रमात प्रमुख अतिथी साहित्यिक ऍड. भालचंद्र मयेकर यांच्या हस्ते ‘स्पंदनं मनातली’ (ललित लेख संग्रह) व मामाचा गाव (बाल कविता संग्रह) या दोन पुस्तकांचे प्रकाशन करण्यात येईल. ही पुस्तके जागर प्रकाशनने प्रकाशित केली आहेत.
विशेष निमंत्रित म्हणून काणकोण येथील श्री मल्लकार्जुन महाविद्यालयाच्या माजी मराठी विभागप्रमुख डॉ. प्रा. प्रमदा गावस-देसाई व केपे येथील सरकारी महाविद्यालयातील साहाय्यक प्राध्यापक दीप्ती फळदेसाई यांची उपस्थिती असेल. साळगावकर यांच्या ललितलेख संग्रहावर राजू भि. नाईक, तर बालकविता संग्रहावर पूर्णिमा देसाई चिकित्सक स्वरूपाचे भाष्य करतील. यावेळी ‘कोमप’चे अध्यक्ष सुदेश आर्लेकर व कार्यवाह अक्षता किनळेकर यांचीही उपस्थिती असेल.