पाटसला असणार ब्लॉक; सोलापूरकरांची उडणार तारांबळ
सोलापूर प्रतिनिधी
मध्य रेल्वेच्या पुणे विभागातील पुणे-दौंड रेल्वे मार्गावरील पाटस स्थानक येथे तीन ऑक्टोबर रोजी ब्लॉक घेऊन विविध तांत्रिक कामे केली जाणार आहेत. त्यामुळे सोलापूर-पुणे हुतात्मा एक्सप्रेस व पुणे- सोलापूर इंटरसिटी एक्सप्रेस यासह अन्य गाड्या रद्द करण्यात आल्याची माहिती पुणे विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. या ब्लॉकमुळे सोलापूर-पुणे प्रवास करणाऱ्या सोलापूरकरांची तारांबळ उडणार आहे.
या गाड्या रद्द
पुणे-सोलापूर-पुणे हुतात्मा एक्स्प्रेस, पुणे-सोलापूर-पुणे इंटरसिटी एक्स्प्रेस, दौंड- हडपसर पॅसेंजर, बारामती-दौंड पॅसेंजर, पुणे- बारामती पॅसेंजर, पुणे-दौंड-पुणे पॅसेंजर या गाड्या रद्द झाल्या आहेत.
या गाड्या अंशतः रद्द
३ ऑक्टोबर – हडपसर – हैदराबाद एक्स्प्रेस हडपसरऐवजी दौंड येथून हैदराबादसाठी सुटेल. २ ऑक्टोबर- सोलापूर-पुणे डेमू दौंड-पुणे दरम्यान रद्द. ३ ऑक्टोबर- बारामती-पुणे पॅसेंजर दौंड-पुणे दरम्यान रद्द. ३ ऑक्टोबर पुणे- बारामती पॅसेंजर पुणे-दौंड दरम्यान रद्द. ३ ऑक्टोबर- हडपसर-सोलापूर डेमू गाडी हडपसर-दौंड दरम्यान रद्द. ३ ऑक्टोबर – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई-बेंगळुरू उद्यान एक्स्प्रेस मुंबई येथून २ तास ५० मिनिटे उशिराने सुटणार आहे.
या गाड्यांना तात्पुरता थांबा
मुंबई- बंगळूर उद्यान एक्स्प्रेसला (पाटस), हैदराबाद-मुंबई एक्स्प्रेस (पाटस), चेन्नई-लोकमान्य टिळक टर्मिनल एक्स्प्रेस (पाटस, लोणी), मुंबई-लोकमान्य तिलक टर्मिनस एक्स्प्रेस (यवत), कोईम्बतूर – हैदराबाद एक्स्प्रेस (पाटस, उरुळी).