चित्रपटाच्या चित्रिकरणाला प्रारंभ
अभिनेत्री राधिका मदानने ‘रुमी की शराफत’ या चित्रपटाचे चित्रिकरण सुरू केल्याची घोषणा केली आहे. या चित्रपटाची निर्मिती दिनेश विजान यांची कंपनी मॅडडॉककडुन केली जात आहे. यापूर्वी या कंपनीने अंग्रेजी मीडियम आणि शिद्दत या चित्रपटांची निर्मिती केली होती. रुमी की शराफत या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रशांत भाग्य करत आहेत.
राधिका मदानने सोशल मीडियावर या चित्रपटाची घोषणा करत त्यासंबंधी अधिक माहिती दिली आहे. तसेच क्लॅपबोर्डसह स्वतःचे एक छायाचित्र शेअर केले आहे. ‘मूर्खपणा सुरू, रुमीला भेटण्यासाठी मी उत्सुक आहे’ असे तिने कॅप्शनमध्ये नमूद केले आहे. या चित्रपटातील अन्य कलाकारांसंबंधी अद्याप माहिती मिळू शकलेली नाही.
राधिका अलिकडेच आसमान भारद्वाजचा चित्रपट ‘कुत्ते’मध्ये दिसून आली होती. या चित्रपटात तिच्यासोबत तब्बू, अर्जुन कपूर, कोंकणा सेन शर्मा आणि कुमुद मिश्रा यांची महत्त्वाची भूमिका होती. तसेच राधिका लवकरच कच्चे नींबू या वेबसीरिजमध्ये दिसून येणार आहे. याचबरोबर ‘सना’मध्ये ती काम करत आहे. तसेच ‘हॅप्पी टीचर्स डे’ चित्रपटात ती मुख्य भूमिकेत आहे.
राधिकाने आतापर्यंत अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. तिच्या चित्रपटांना प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद देखील मिळाला आहे. तसेच ती सोशल मीडियावर अत्यंत सक्रीय आहे. राधिका स्वतःची छायाचित्रे तसेच चित्रफिती शेअर करत असते.