राजाराम सहाकारी साखर कारखान्याच्या अतितटिच्या निवडणुकीत संस्था गटाचा निकाल बाहेर आला असून माजी आमदार महादेवराव महाडिक हे संस्थागटातून निवडून आले आहेत. मतमोजणीमध्ये आघाडीवर असलेल्या महाडीक पॅनेलचा महाडिकांच्या या विजयाने खाते खोलले आहे.
एकूण 129 मतदान असलेल्या संस्थागटामध्ये आपल्याकडेच सर्वात जास्त ठराव असल्याचा दावा दोन्हीकडच्या पॅनेलकडून केला जात होता. तसेच स्वता माजी आमदार महादेवराव महाडिक पॅनेलप्रमुख म्हणून या गटातून निवडणूक निवडणुकीच्या रिंगणात उभे होते. त्यामुळे संस्थागटतील निकालाकडे सर्वांचे लक्ष लागून होते.
महादेवराव महाडिक यांना 129 पैकी 84 मते मिळाली असून विरोधी परिवर्तन पॅनेलचे सचिन पाटील यांना 44 मते मते पडली आहेत. महाडीक 45 मतांनी विजयी झाले आहेत.