बॉलिवूडमधील गुणवान अभिनेता रणदीप हुड्डा आणि नीना गुप्ता लवकरच ‘पचहत्तर का छोरा’ या चित्रपटात एकत्र दिसून येणार आहेत. रोमँटिक कॉमेडी धाटणीचा हा चित्रपट असणार आहे. नीना गुप्ता यांनी चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर शेअर केले आहे.
‘एज नो बार? पचहत्तर का छोरा सादर करत आहोत. ट्विस्टसह एक वेगळी रोमकॉम’ असे नीना गुप्ता यांनी याच्या कॅप्शनमध्ये म्हटले आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन जयंत गिलटर यांच्याकडून केले जाणार आहे. चित्रपटाचे चित्रिकरण सुरू झाले आहे. ‘पचहत्तर का छोरा’ चित्रपटात गुलशन ग्रोव्हर आणि संजय मिश्रा देखील महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. राजस्थानच्या राजसमंदमध्ये याचे चित्रिकरण सुरू करण्यात आले आहे.
हा चित्रपट माझ्यासाठी आतापर्यंतचा सर्वात वेगळा ठरणार आहे. हा एक रोमँटिक ड्रामा असून यात स्थितीनुरुप विनोदाची पेरणी करण्यात आली आहे. हा चित्रपट प्रेक्षकांना विचार करायला देखील लावणार आहे. प्रेक्षकांनी अशाप्रकारची प्रेमकहाणी कधीच पाहिली नसेल असे माझे मत असल्याचे रणदीपने म्हटले आहे.