मेष
आपल्या मित्रांशी किंवा कुटुंबीयांशी बोलताना वाणीवर नियंत्रण ठेवणे गरजेचे असेल. एखादा अजाणतेपणे वापरलेला शब्द इतरांची मने दुखवू शकतो. आर्थिक नियोजन करताना दमछाक होण्याची शक्मयता आहे. नोकरदार वर्गाला कामाचा व्याप वाढलेला दिसेल. व्यापाऱ्यांना तेजीचा अनुभव येण्याची शक्मयता आहे. तब्येत सांभाळावी.
लाल फुल दान करावे
वृषभ
कष्टाच्या मानाने परतावा कमी मिळण्याची शक्मयता असल्याने अपेक्षांचे ओझे वाढवणे योग्य ठरणार नाही. काही कामे आयत्या वेळेला पुढे ढकलली गेल्याने वेळेचे नियोजन ढासळू शकते. ताण-तणावांना सामोरे जाताना आत्मविश्वास मजबूत ठेवा. एखादी ओळखीचे व्यक्ती आर्थिक मदत करण्याविषयी विनवणी करू शकते. निर्णय घेताना सावध रहा.
आंघोळीच्या पाण्यात चमचाभर दूध घालावे.
मिथुन
नेमके काय करावे असा संभ्रम निर्माण करणारी परिस्थिती निर्माण होण्याची शक्मयता आहे. अशावेळी ज्येष्ठ आणि अनुभवी व्यक्तीचा सल्ला काम येईल. लांबच्या नातेवाईकाला मदत करण्याकरता प्रवास करावा लागू शकतो. या आठवड्यात कोणत्याही बाबतीत मध्यस्थी होणे टाळावे. लोकांचे चांगले करण्याच्या नादात तुमचे नुकसान होऊ शकते.
मुळा दान द्यावा
कर्क
भावनिक संघर्षाचा आठवडा असेल. हा संघर्ष घरातील एखाद्या सदस्याच्या निर्णयासंबंधी असू शकतो किंवा तुम्ही करत असलेल्या कामाच्या संदर्भात असू शकतो. आर्थिक आवक चांगली असली तरी ती आणखी सुधारण्याच्या नादात तब्येतीकडे दुर्लक्ष होऊ नये याची काळजी घ्यावी. कुटुंबीयांकरता वेळ काढणे गरजेचे असेल.
नदीच्या किनाऱ्याकडील माती घरी ठेवावी.
सिंह
गेले काही दिवस मनासारख्या काही घटना घडल्यामुळे तुमचा मूड चांगला असेल. या आठवड्यात दुसऱ्यांना मदत करण्याकडे तुमचा कल असण्याची शक्मयता आहे. ऑफिसमधील कामांकडे दुर्लक्ष केल्यास त्यामध्ये चुका होऊन नुकसान होऊ शकते. वैवाहिक जोडीदाराला सौम्य शब्दात समजावल्यास अवघड कामे सोपी होतील. गोमती चक्र जवळ ठेवावे
कन्या
तुम्ही अपेक्षा कराल त्याप्रमाणे कामे पूर्ण न झाल्याने किंवा मनासारख्या घटना न घडल्याने थोड्या प्रमाणात निराशा येऊ शकते. पण आठवड्याच्या मध्याला नवीन संधी प्राप्त होऊन, नवीन कामांची ऑर्डर मिळाल्याने उत्साह वाढेल. नोकरदार वर्गाला डॉक्युमेंटेशनकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. मनातील गोष्टी शक्यतो शेअर करू नका.
लहान मुलांना आंबट गोड मिठाई वाटावी.
तूळ
हा आठवडा मानसिक समाधानाचा असेल. हे समाधान केलेल्या कामाचा परतावा योग्य मिळाल्याने मिळू शकते. त्याचबरोबर कुटुंबातील सदस्यांमध्ये एकमत झाल्याने सुद्धा समाधान प्राप्त होऊ शकते. मागील काही दिवसांच्या तुलनेने आर्थिक आवक थोडी कमी असल्याने काळजी वाटू शकते पण पुढे चांगल्या संधी मिळतील.
कष्टकऱ्यांना दूध वाटावे
वृश्चिक
तब्येतीच्या तक्रारी कमी होतील. पण खाण्यापिण्याच्या बाबतीत सावध राहणे कधीही फायदेशीर असते. या आठवड्यात नवीन कामांविषयी काही व्यक्तींशी चर्चा कराल. नवीन प्रोजेक्ट किंवा नवीन कामे सहजतेने मिळण्याची शक्मयता आहे. स्पर्धा वाढल्याने काहीबाबतीत कठोर निर्णय घ्यावे लागतील. वैवाहिक जीवन चांगले असेल.
सरकारी झाडांना पाणी घालावे
धनु
मनात योजलेली कामाची पद्धत आणि आयत्या वेळेला करावा लागलेला बदल याने गोंधळ उडू शकतो. अशावेळी सोबत काम करणाऱ्यांची मदत मागणे चुकीचे ठरणार नाही. या आठवड्यात कोणाविषयीही काहीही बोलताना सावध राहण्याची गरज आहे. या गोष्टीचा गैरफायदा समोरची व्यक्ती पुढे जाऊन घेऊ शकते. जोडीदाराच्या तब्येतीची काळजी घ्या.
तुळशीचे पान जवळ ठेवा
मकर
सध्या कष्टाचे प्रमाण वाढवावे लागले तरी पुढे जाऊन अशा संधी मिळतील ज्यातून चांगल्या प्रकारे फायदा उचलू शकाल. ऑफिसमध्ये काम करत असताना तुमच्यावर कोणत्याही प्रकारचा आळ येणार नाही याची काळजी घ्यावी लागेल. काही लोक आपण केलेल्या चुकांना तुमच्या माथी मारू शकतात. वैवाहिक जोडीदाराचे म्हणणे समजून घ्यावे.
कोहळा दान द्यावा
कुंभ
हा आठवडा तसा पाहिला तर संमिश्र्र असेल. काही माणसांकडून चांगले अनुभव मिळतील तर काही लोकांकडून कटू अनुभव मिळण्याची शक्मयता आहे. या कटू अनुभवांना पचवून यातून काही नवीन शिकता येते का हे पहावे लागेल. आर्थिक बाबतीत विशेष काळजी करण्याचे कारण नाही. तब्येतीच्या लहान मोठ्या तक्रारी त्रास देऊ शकतात.
मुंग्यांना साखर घालावी
मीन
सततची दगदग आणि धावपळ यामुळे विश्र्रांती करता लांबच्या ठिकाणी जावे असे वाटू शकते. कुटुंबातील सदस्यांची आणि विशेषत: वैवाहिक जोडीदाराची योग्य वेळी साथ मिळाल्याने कामे सहजतेने पूर्ण होतील आणि समाधान वाटेल. तुमच्या इच्छा आणि आकांक्षा इतरांवर लादण्याचा प्रयत्न केल्यास निराशा हाती लागू शकते. तब्येत सांभाळावी.
तेलाचे दान द्यावे
आर्थिक बाजू कमजोर असणे किंवा पैशाची चिंता असणे, पैसा न टिकणे हे आज-काल कॉमन झालेले आहे. अशा वेळेला मातीची कुंडी आणावी. त्यात जवळच्या सुपीक क्षेत्राकडील माती भरावी. त्यात कोणतेही झाड लावू नये. पाणी जरूर घालावे. आणि ही कुंडी घराच्या उत्तर दिशेला ठेवावी. माती ओली राहील याची काळजी घ्यावी. फायदा जरूर होईल.