वार्ताहर,कार्वे
Kolhapur News : जालना येथे मराठा समाजाच्या मोर्चा दरम्यान पोलिसांनी केलेल्या लाठीमाराचा निषेध नोंदवून मनोज जरंगे पाटील यांना पाठिंबा दर्शविण्यासाठी पाटणे फाटा येथे आज चंदगड तालुक्यातील सकल मराठा समाजाची बैठक संपन्न झाली. या बैठकीत आंदोलनाला पाठिंबा दर्शवत बुधवार दिनांक 13 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी 11 वाजता पाटणे फाटा येथे रास्ता रोको आंदोलन करण्याचे ठरविण्यात आले. यानिमित्त चंदगड तालुक्यातून मराठा समाजाने आंदोलनाचा एल्गार पुकारला असून, याची सुरुवात बुधवारपासून होत आहे.
बैठकीच्या अध्यक्षस्थानी मराठा महासंघाचे अध्यक्ष सुरेश सातवणेकर होते. स्वागत निवृत्ती हारकारे यांनी केले. प्रास्ताविक प्रा दीपक पाटील यांनी करून मराठा आरक्षण बाबत 1982 सालापासून सुरू असलेल्या मागणीचा इतिवृत्तांत मांडला. हायकोर्टात मंजूर झालेले आरक्षण सुप्रीम कोर्टात रद्द झाले. मनोज जरांगे पाटील यांची मागणी आहे की सरसकट कुणबी दाखले द्यावेत. कायदा करणारी माणसे आम्हीच निवडून दिली आहेत. आमची मागणी मान्य करून नोकरी व शिक्षण यामध्ये आम्हाला आरक्षण मिळावे, अशी मागणी केली.
पुन्हा एकदा मराठा समाज जागृत झाला आहे. ही अभिमानास्पद बाब आहे. आमच्या हक्काचं आरक्षण आम्हाला पाहिजेत. ही चळवळ उभी करण्यासाठी साठी जे काय योगदान लागेल ते देण्यासाठी तयार असल्याचे भाजपा नेते शिवाजीराव पाटील यांनी स्पष्ट केले. मराठा समाजासाठी कोणी किती योगदान दिले यापेक्षा कुणीच काय केलं नाहीं म्हणून मराठा समाज्यावर अन्याय झाला आहे. असे मत काँग्रेस नेते गोपाळराव पाटील यांनी मांडले. मनोज जरांगे पाटील यांच्या सर्व मागण्यांना आमचा पाठिंबा आहे. आम्ही कुणबी होतो. हे सरकारला माहीत आहे. सारथी चे पैसे परत जाणार आहेत. यासाठी मराठा तरुणांनी पुढे येणे गरजेचे आहे.असे बळीराजा संघटनेचे नितीन पाटील यांनी स्पष्ट केले. तालुक्यातील सर्व आंदोलने नियोजनपूर्वक होतात, मात्र मराठा समाजाचे आंदोलन का होत नाही. यासाठी नियोजन महत्वाचे आहे. सर्व नेते मंडळींनी भाग घेतल्यास आंदोलनाला ताकद मिळेल.. अशी भावना संतोष मळविकर यांनी व्यक्त केली. नेतृत्व करणारेच समाजाला सोडून भांडलंदारांना सामील झाले आहेत. असा आरोप विष्णू गावडे यांनी केला.
ज्यांना आम्ही खुर्चीवर बसवलं आहे. त्यांनी योगदान देणं गरजेचं आहे… 2016 पासून छोटी मोठी आंदोलने करण्यात आली. व बुधवारी पाटणे फाटा येथे मोठे रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल असे अध्यक्ष स्थानावरून बोलताना सुरेश सातवेकर यांनी जाहीर केले. यावेळी जगन्नाथ हुलजी, शंकर मनवाडकर, अशोक गावडे, गणेश फाटक.. यांनी मनोगत व्यक्त केले मेळाव्यास माजी सभापती शांताराम पाटील, विलास पाटील, नामदेव पाटील, संदीप नांदवडेकर, जानबा चौगुले, विवेक पाटील, पिनू पाटील यांच्यासह सकल मराठा समाजाचे कार्यकर्ते उपस्थित होते..