मुंबई
भारतीय शेअरबाजारात बुधवारी घसरणीचा माहोल राहिल्याचे पाहायला मिळाले, यात एसबीआय कार्डचा समभागदेखील नकारात्मकतेत व्यवहार करताना दिसला. एसबीआय कार्डस् आणि पेमेंट सर्व्हिसेसचा समभाग गेल्या दोन सत्रात 6 टक्के इतका खाली आला आहे. बुधवारी बीएसईवर एसबीआय कार्डचा समभाग इंट्रा डे दरम्यान 3 टक्के इतका घसरत 718 रुपयांवर आला होता. याआधी हा समभाग 746 रुपयांवर बंद झाला होता. एसबीआय कार्डला डिसेंबर तिमाहीत अपेक्षीत नफा पदरात पडला नसल्याच्या बातमीने समभागावर परिणाम केल्याचे सांगितले जात आहे.