Sushma Andhare Sanjay Shirsat ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांच्यावर टिका करू शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी वदग्रस्त विधान केले होते. त्यांच्या या विधानाबद्दल सुषमा अंधारे यांनी पोलिसांत तक्रार करून गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. पण ही तक्रार दाखल न करून घेतल्याने सुषमा अंधारे यांनी थेट न्यायलयाचा दरवाजा ठोठावत संजय शिरसाट यांच्या विरूद्ध आब्रुनुकसानीचा दावा दाखल केला आहे. त्यानंतर टिव्ही 9 मराठी या माध्यमांशी बोलताना त्यांनी संजय शिरसाट यांना गल्लीतील कुत्रेही विचारच नसल्याचा दावा करून त्यांच्यावर टिका केली.
आपल्या मुलाखतीमध्ये बोलताना त्या म्हणाल्या “संजय शिरसाटांनी जे काय वक्तव्य केल आहे त्याबद्दल मी शिरसाटांविरोधात परळी, संभाजीनगर आणि पुण्यात गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न केला. पण, त्यांच्याविरूद्ध कोठेही गुन्हा दाखल करहण्यात आला नाही. पण यापुर्वी सत्ताधारी असलेल्या शिंदे गटातील शीतल म्हात्रे प्रकरणात मात्र तातडीने गुन्हा दाखल करून काही लोकांना अटक करण्यात आली. तसेच गणेश बीडकर यांचा डान्सबारमधील व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर लगेच गुन्हा दाखल करण्यात आला.” असा आरोप सुषमा अंधारेंनी सरकारवर केला.
मागील काही दिवसात संजय शिरसाट यांनी सुषमा अंधारे स्टंटबाजी करतात असे म्हणून एका जाहीर कार्यक्रमात त्यांच्याविषयी वादग्रस्त विधान केले होते. त्यावर सुषमा अंधारेंनी जोरदार टिका करत, “अडगळीत पडलेल्या शिरसाटांना कोणी ओळखत नव्हते. तसेच शिरसाट हे नावसुद्धा कोणाला माहिती नव्हते. पण, माझ्यावर आरोप केल्यानंतर शिरसाटांचं नाव चर्चेत आलं. शिरसाट आमदार असूनसुद्धा त्यांना गल्लीतले काळ कुत्रेही विचारत नव्हतं. मला स्टंट करायचा असता किंवा आर्थिक लाभ मिळवायचा असता, तर लाखो– कोटी रुपयांची मागणी केली असती. पण मी फक्त तीन रुपयांचा अब्रुनुकसानीचा दावा करत आहे.”
या प्रकारानंतर शिरसाटांनी लगेच अब्रुनुकसानीचा दावा करू द्या अथवा सर्वोच्च न्यायालयात जाऊ द्या, मी त्याची काळजी करत नसल्याचे म्हटले आहे. त्यावर सुषमा अंधारे यांनी “हा त्यांचा अहंकार असून त्यांना खात्री आहे कि, काहीही झाले, तरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या आमदारांना वाचवणार. या अहंकाराचा फणा ठेचण्यासाठीच मी लढा देत आहे.” असे त्या म्हणाल्या