चालक जखमी; मोहोळ-मलीकपेठ दरम्यान ची घटना;सर्व प्रवासी सुखरूप
सोलापूर प्रतिनिधी
सोलापूरहून दिल्लीला जाणाऱ्या केके एक्सप्रेसच्या इंजिनमध्ये शॉर्टसर्किट झाल्याने भीषण आग लागली. ही आग रेल्वे चालकाच्या लक्षात येताच त्याने तात्काळ गाडी थांबवली. रेल्वे चालक आग विझविण्याचा प्रयत्न करत असताना भाजला गेला असून जखमी झाला आहे. त्यास मोहोळ येथे उपचारासाठी पाठवण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. इंजिन पाठीमागील जनरल डब्यातील प्रवाशांना खाली उतरवल्याने सर्व प्रवासी सुखरूप असल्याचे माहिती रेल्वेच्या विश्वसनीय अधिकाऱ्याने दिली. सकाळी पावणे नऊच्या सुमारास ही घटना घडली आहे.
रेल्वे थांबताच प्रवाशांनी उड्या मारल्या. तोपर्यंत इंजिनला लागलेली आग शेजारच्या डब्ब्यात पसरू नये यासाठी अग्निरोधक यंत्राच्या साह्याने आग विझवण्यात आली इंजिन मध्ये शॉर्टसर्किट झाल्याने गाडी मागील एक तासापासून मूळ स्थानकावरच थांबून आहे.