वृत्तसंस्था/ राऊरकेला
आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनच्या येथे सुरू असलेल्या पुरुषांच्या विश्वचषक हॉकी स्पर्धेत रविवारी ड गटातील झालेल्या सामन्यात स्पेनने वेल्सचा 5-1 अशा गोलफरकने दणदणीत पराभव केला तर भारत व इंग्लंड यांच्यातील रोमांचक ठरलेला सामना गोलशून्य बरोबरीत राहिला. भारताचा पुढील सामना वेल्सविरुद्ध 19 रोजी होणार असून मोठय़ा फरकाने हा सामना त्यांना जिंकावा लागेल.
येथील बिरसा मुंडा आंतरराष्ट्रीय हॉकी स्टेडियमवर खेळवल्या गेलेल्या या सामन्यात भारत व इंग्लंड दोन्ही संघांना मिळालेल्या संधींचा लाभ घेता आला नाही. बरोबरीमुळे दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण मिळाला. इंग्लंड 4 गुणांसह गटात आघाडीवर आहे भारताचेही 4 गुण आहेत. गोलफरकामुळे ते दुसऱया स्थानावर आहेत.
स्पेन विजयी
स्पेनतर्फे रिने मार्क आणि मिरालेस मार्क यांनी प्रत्येकी दोन गोल केले. वेल्सचे या स्पर्धेत पहिल्यांदाच पदार्पण झाले आहे. या विजयामुळे स्पेनने ड गटात दुसऱया स्थानावर झेप घेतली आहे. या गटात भारत सध्या तिसऱया स्थानावर आहे. स्पेनने दोन सामन्यातून तीन गुण नोंदवले आहेत. स्पेनने या गटात एक सामना जिंकला असून एक सामना गमवला आहे. त्यांना आपले खाते गुणतक्त्यात उघडता आलेले नाही. वेल्सला इंग्लंड आणि स्पेन यांच्याकडून पहिल्या दोन सामन्यात पराभव पत्करावा लागला आहे.
रविवारच्या सामन्यात पहिल्या 15 मिनिटामध्ये दोन्ही संघांकडून खाते उघडलेले गेले नाही. मात्र 16 व्या मिनिटाला रिने मार्कने स्पेनचे खाते उघडले. 22 व्या मिनिटाला गेरार्द क्लेप्सने स्पेनचा दुसरा गोल केला. या गोलनंतर स्पेनला पेनल्टी स्ट्रोक मिळाला पण त्यांना लाभ उठवता आला नाही. मध्यंतरापर्यंत स्पेनने वेल्सवर 2-0 अशी आघाडी मिळवली होती. 32 व्या मिनिटाला मिरालेस मार्कने पेनल्टी कॉर्नरवर स्पेनचा तिसरा गोल केला. रिने मार्कने 36 व्या मिनिटाला आपला वैयक्तीक दुसरा आणि संघाचा चौथा गोल नेंदवला. 52 व्या मिनिटाला कार्सन जेम्सनने वेल्सचे खाते उघडले पण सामना संपण्यास दोन मिनिटे बाकी असताना मिरालेस मार्कने आपला वैयक्तीक दुसरा तसेच संघाचा पाचवा गोल नोंदवून वेल्सचे आव्हान संपुष्टात आणले.
रविवारचे निकाल
1) स्पेन विवि वेल्स 5-0
2) भारत बवि इंग्लंड 0-0
आजचे सामने
1) मलेशिया वि. चिली
वेळ ः दु. 1 वा.,
2) न्यूझीलंड वि. नेदरलँड्स
वेळ ः दु. 3 वा.
3) फ्रान्स वि. द.आफ्रिका
वेळ ः सायं. 5 वा.
4) अर्जेन्टिना वि. ऑस्ट्रेलिया
वेळ ः सायं 7 वा.