प्रचारादरम्यान केले शक्तिप्रदर्शन
प्रतिनिधी /पेडणे
धारगळ पंचायत वार्ड क्रमांक 7 मधून सौ.अमिता श्रीकृष्ण हरमलकर यांना मतदारांचा उत्स्फूर्त पाठिंबा मिळत असून आरोबा येथे घर घर चलो प्रचारा दरम्यान त्यांनी शक्ती प्रदर्शन करत आपला विजय हा मोठय़ा मताधिक्मयाने होणार असल्याचे दैनिक तरुण भारतला सांगितले.
सौ. अमिता श्रीकृष्ण (नाना) हरमलकर. हे कै. रवींद्र हरमलकर (माजी उपसरपंच) आणि कै. सुलोचना हरमलकर यांची धाकटी सून असून हरमलकर कुटुंबीय हे समाजसेवेतून राजकारण करत आले आहे.त्यांचा वारसा पुढे नेण्यासाठी आणि त्यांचे दिर तुकाराम हरमलकर (माजी जि.पं.सदस्य, धारगळ) तसेच त्यांचे पती श्रीकृष्ण हरमलकर उर्फ नानू यांनी केलेल्या सामाजिक कार्यातून प्रेरणा घेऊन आपण आपल्या शिरगळ आरोबा वार्ड क्र. 7 मधून पंचायत निवडणूक आपल्या वार्डमधून सर्वांच्या सहकार्याने लढवित असल्याचे सांगितले.
आमिता हरमलकर यांनी आपला वचननामा प्रसिद्ध केला असून या वचननामा विविध समस्या आणि विकासकामे मार्गी लावाण्याचे आश्वासन दिले आहे.
गेल्या कित्येक वर्षापासून वार्ड क्र. 7 मध्ये रस्ते, पाणी व वीजेसंबंधी समस्या आहे. या समस्या ग्रामस्था?च्या सहकार्याने निवडून आल्यास संबंधित विषयाला अनुसरुन त्याचा पंचायत बैठकांमध्ये पाठपुरावा करुन व सर्व समस्यांचे त्या – त्या सरकारी खात्यांमध्ये जाऊन पाठपुरावा आणि त्यावर तोडग्यासाठी सरकार दरबारी प्रयत्न करणार आहेत.
क्रीडा क्षेञाला योगदान देण्यासाठी आराबो आणि शिरगाळ स्पोर्ट्स क्लबला पुढील 5 वर्षांसाठी वार्षिक रु.25,000/- क्रीडा अनुदान दिले जाईल . मांगिरीश विद्यालय हायस्कूलचे सुशोभीकरण. उच्च शिक्षण घेणाऱयाना अभ्यास समन्वय आर्थिक मदत. दर वषी प्रत्येक नागरिकांची आरोग्याची काळजी घेण्याची तपासणी शिबिरांचा आयोजन करणे. आराबो आणि शिरगळ येथील 7 गरजू कुटुंबांना पुढील 5 वर्षांसाठी प्रति महिना रु. 2000/-आर्थिक मदत म्हणून दिले जातील.
पंच सदस्य म्हणून माझ्या संपूर्ण कार्यकाळासाठी 6 गरजू विद्यार्थ्यांना पाचवी ते दहावी इयत्तेतील प्रति विद्यार्थी रु. 1000/- विद्यार्थी मदत निधी दिली जाणार असल्याचे वचननाम्यात म्हटले आहे.
महिला सक्षम होण्यासाठी आणि त्यांना रोजगार उपलब्ध करण्यासाठी आणि स्वयंरोजगार याला प्राधान्य दिले जाईल. गावातील सांस्कृतिक वातावरण टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करीन, संगीत वर्ग, नाटक, फुगडी आणि इतर सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी काम करणार आहे.
प्रशिक्षण आणि समुपदेशन कार्यक्रम आयोजित करुन जे पंचायत क्षेत्र प्रथम येणार त्यांना योग्य ती मदत करणार. आरोबा-शिरगळ येथील सर्व मंदिराचे सुशोभिकरण करण्यास पुढाकार घेणार. पंचायत स्तरावर आणि राज्य स्तरावरील सर्व शासकीय योजना आणि इतर लाभार्थी कुटुंबांना कोणताही भेदभाव न करता योजना त्यांना मिळवून दिल्या जातील. कुठालीही समस्या आणि अडचण आसेल तर आपल्या वार्ड मधील नागारिनी माझ्याशी संपर्क साधावा. वार्ड क्रमांक 7 मधील मतदार बंधू-भगिनींना व युवा मतदारांनी विमान या चिन्हावर शिक्का मारुन त्यांना प्रचंड बहुमतांनी विजयी करावे व पाच वर्षासाठी आपली सेवा करण्याची संधी द्यावी असे आवाहन सौ.अमिता श्रीकृष्ण हरमलकर यांनी केले आहे.