पुणे / प्रतिनिधी :
राज्यातील अनेक भागांत पुढील दोन दिवस ढगाळ वातावरण तसेच तुरळक पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
पश्चिमेकडून बाष्पयुक्त वाऱ्यांमुळे कोकणात काही ठिकाणी तसेच मध्य महाराष्ट्राच्या काही भागांत मंगळवारी तुरळक पावसाने हजेरी लावली. या वाऱ्यांच्या प्रभावामुळे पुढील दोन दिवस राज्यात तुरळक पावसाची शक्यता आहे. तसेच कमाल तापमानातही 2 ते 3 अंश सेल्सिअसने वाढ होईल.
अधिक वाचा : परदेशात कांदा पाठविण्याच्या बहाण्याने व्यावसायिकाची 46 लाखांची फसवणूक