पुलाची शिरोली प्रतिनिधी
पुणे- बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील टोप फाटा(ता. हातकणंगले) येथे एसटी बस पलटी झाली. यामध्ये पंधरा प्रवासी जखमी झाले आहेत. ठाणे (मुंबई) कडून कोल्हापूरमार्गे चंदगडकडे जाणारी महाराष्ट्र शासनाची ही बस होती. सदरची घटना सोमवारी पहाटे चारच्या सुमारास घडली. यामधील पंधरा प्रवासी जखमी झाले आहेत. त्यांना कोल्हापूरमध्ये सरकारी दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे.