अभिनेत्रीचा किलर लुक सादर
अभिनेत्री तमन्ना भाटियाने सोशल मीडियावर रजनीकांत यांचा आगामी चित्रपट ‘जेलर’मध्ये काम करत असल्याची घोषणा केली आहे. तमन्नाने उर्वरित कलाकारांच्या लुकसोबत स्वतःचा फर्स्ट लुकही सादर केला आहे. तमन्नाचा हा लुक जेलर चित्रपटासंबंधी चाहत्यांची उत्सुकता अधिकच वाढवत आहे. रजनीकांत यांच्यासोबत तमन्नाची ऑनस्क्रीन केमिस्ट्री पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.
अभिनेत्रीला या घोषणेनंतर तिचे चाहते सोशल मीडियावर शुभेच्छा देत आहेत. तमन्नासाठी हा चित्रपट अत्यंत महत्त्वाचा आहे. तर रजनीकांत यांचा हा 169 वा चित्रपट असणार आहे. जेलर चित्रपटाचे दिग्दर्शन नेल्सन दिलीपकुमार यांनी केले आहे. मागील महिन्यात रजनीकांत यांच्या जन्मदिनी चित्रपटाच्या टीझरसह त्यांचा लुक देखील शेअर करण्यात आला होता. ‘जेलर’ चित्रपटात राम्या कृष्णन, योगी बाबू, विनायकन आणि वसंत रवि यासारखे कलाकारही दिसून येणार आहेत.
तमन्ना भाटिया सध्या अभिनेता विजय वर्मासोबतच्या कथित रिलेशनशिपवरून चर्चेत आहे. परंतु या दोघांनीही स्वतःच्या रिलेशनशिपच्या चर्चेवर अद्याप कुठलीच प्रतिक्रिया दिलेली नाही.