श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या कुलगाममधील मिशीपोरा भागात गुरुवारी चकमक झाली. या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले आहेत. कुलगाममध्ये टार्गेट किलिंगमध्ये ठार झालेल्या शिक्षिका रजनी बाला यांच्या हत्येतील दहशतवाद्याचा यामध्ये समावेश आहे. या दहशतवाद्यांवरील कारवाईसाठी 14 जूनपासून परिसरात नाकाबंदी आणि शोधमोहीम सुरू होती. अनंतनाग जिह्यातील कोकरनाग भागात हिजबुल मुजाहिद्दीनचे दोन दहशतवादी लपल्याची माहिती गुप्तचर सूत्रांकडून सुरक्षा यंत्रणांना मिळाली होती. त्यानुसार सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. दरम्यान, आणखी एका कारवाईमध्ये पुलवामामध्ये 15 किलो स्फोटके जप्त करण्यात आली आहेत. दहशतवाद्यांना या आयईडीद्वारे मोठय़ा घातपाताचा कट रचला होता. याप्रकरणी दहशतवाद्यांना मदत करणाऱया दोघांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाची अधिक चौकशी सुरू असल्याचे काश्मीरचे आयजीपी विजय कुमार यांनी सांगितले.
Previous Articleभारत-द. आफ्रिका यांच्यात आज चौथी टी-20
Next Article पर्पल डॉट कॉम बनली युनीकॉर्न
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.