मागील वर्षाच्या तुलनेत यंदा प्रवेश घेणाऱयांची संख्या 9 हजारांनी कमी
प्रतिनिधी /बेळगाव
कोरोनामुळे सरकारी शाळांमध्ये प्रवेश घेणाऱया विद्यार्थ्यांची संख्या 2020-21 या शैक्षणिक वर्षात लक्षणीय वाढली होती. परंतु यावषी सरकारी शाळेत प्रवेश घेणाऱयांची संख्या रोडावत चालली आहे. बेळगाव शैक्षणिक जिल्हय़ात यावषी इयत्ता पहिलीसाठी 30 हजार 234 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यावषी प्रवेश घेणाऱयांची संख्या 9 हजारांनी कमी झाल्याने पुन्हा एकदा चिंता व्यक्त केली जात आहे.
कोरोनाच्या काळात विद्यार्थ्यांना शाळेपर्यंत पोहोचणे अशक्मय असल्याने ऑनलाईन वर्ग भरविले जात होते. खासगी शाळांची भरमसाट फी भरून ऑनलाईन शिक्षण घेणे परवडणारे नसल्याने अनेक पालकांनी आपल्या पाल्यांना सरकारी शाळेत दाखल केले. यामुळे दरवषी सरकारी शाळेतील कमी होणारी पटसंख्या 2020-21 मध्ये कमालीची वाढली होती. शहरी भागातील काही सरकारी शाळा तर प्रवेश फुल्ल झाल्याने इतर शाळांमध्ये प्रवेश घ्यावे, असे सांगत होते.
सरकारी शाळांमधील वाढलेल्या पटसंख्येचा आनंद हा वर्षभरापुरताच होता. कोरोनाचे प्रमाण कमी होताच पुन्हा एकदा विद्यार्थ्यांनी व त्यांच्या पालकांनी खासगी शाळेचा पर्याय निवडला आहे. 2020-21 मध्ये बेळगाव शैक्षणिक जिल्हय़ात 39 हजार 326 विद्यार्थ्यांनी पहिलीच्या वर्गात प्रवेश घेतला होता. तर 2022-23 या चालू शैक्षणिक वर्षात 30 हजार 234 विद्यार्थ्यांनी पहिलीला प्रवेश घेतलेला आहे. मागील वषीच्या तुलनेत 9 हजार 92 विद्यार्थ्यांची संख्या कमी झाली आहे. तर चिकोडी शैक्षणिक जिल्हय़ात 2021-22 साली 57 हजार 390 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला होता. यावषी 38 हजार 113 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतल्याची नोंद करण्यात आली आहे.
बेळगाव शैक्षणिक जिल्हय़ातील आकडेवारी
तालुका | 2021-22 | 2022-23 |
बेळगाव शहर | 8329 | 6471 |
बेळगाव ग्रामीण | 7676 | 6385 |
खानापूर | 4199 | 3466 |