शेकडो वर्षांपूर्वी झाले होते गायब
स्पेनमध्ये रोमनकाळातील एका गावाचे अवशेष मिळाले आहेत. हे अवशेष एक नदी कोरडी झाल्याने समोर आले आहेत. स्पेनमध्ये सध्या उष्णतेची लाट पसरली असून पूर्ण भाग मोठय़ा दुष्काळाच्या सावटाखाली आहे. याचमुळे नद्यांमधील अनेक अवशेष आता समोर येऊ लागले ओत.
रोमन काळातील गावाचे अवशेष स्पेनच्या गलिशिया भागात मिळाले आहेत. हे अवशेष लिमा नदीच्या पाणीपातळीत मोठी घट झाल्याने समोर आले आहेत. लिमा नदीच्या काठावर मिळालेले हे अवशेष सैन्यतळाचे असू शकतात असा तज्ञांचा दावा आहे. प्राचीन रोमन लोकांनी सुमारे 2 हजार वर्षांपूर्वी हे गाव वसविलेले असावे असे मानले जात आहे.
नदी कोरडी पडल्याने मिळालेले अवशेष रोमन फोर्ट एक्विस क्वेरक्वेनिसचा हिस्सा आहेत. हजार वर्षांपूर्वी हा भाग निर्जन झाला होत. त्याच्या काही वर्षांनी हा भाग नदीत सामावला गेला होता. मागील वर्षी या भागातील ड्रोन फुटेज मिळविण्यात आले होते. यात गावाचे अवशेष दिसून आले होते.
एक्विस फोर्टमध्ये सुमारे 600 सैनिकांच्या वास्तव्याची व्यवस्था होती. या सर्वांसाठी वेगवेगळय़ा बॅरक तयार करण्यात आल्या होत्या, येथे एक रुग्णालय, एक मंदिर आणि थर्मल बाथ्स देखील तयार करण्यात आले होते.
युरोपमधील जवळपास तीन-चतुर्थांश भाग सध्या दुष्काळाला तोंड देत आहे. यापासून रोम देखील अस्पृश्य नाही. यापूर्वी टायबर नदीची पातळी खूपच खालावली होती आणि पाण्यात बुडालेला नीरो ब्रिज देखील दिसून आला होता. हा ब्रिज रोमन शासक नीरोने स्वतःच्या शासनकाळात तयार करविला होता.