प्रतिनिधी / बेळगाव
मर्कंटाईल को-ऑप. पेडिट सोसायटीने गेल्या आर्थिक वर्षांत 48 कोटींच्या ठेवी, 46 कोटींची कर्जे, 15 कोटींची गुंतवणूक करीत 213 कोटींची वार्षिक उलाढाल केली आहे. 2 कोटींचे भागभांडवल आणि साडे एकतीस लाख रुपयांचा नफा मिळवून सोसायटी प्रगतीपथावर आहे, अशी माहिती चेअरमन संजय मोरे यांनी दिली.
संस्थेची वार्षिक सर्वसाधारणसभा गेल्या मंगळवारी सोसायटीच्या कार्यालयात पार पडली. त्यावेळी बोलताना संजय मोरे म्हणाले, संस्थेने आता 21 व्या वर्षात पदार्पण केले असून दिवसेंदिवस संस्था प्रगती करत आहे. कोविडमुळे सर्वांनाच कठीण परिस्थितीला सामोरे जावे लागले आणि आर्थिक वर्षात अनेक अडचणी आल्या. पण त्यावरही मर्कंटाईलने मात केली आणि आपले सामाजिक कार्य कायम चालू ठेवले.
व्यवस्थापक विराज भातकांडे यांनी सभासदांचे स्वागत करून अहवाल वाचन केले. यावेळी संस्थेच्या कार्याचे कौतुक करणारी सभासदांचीही भाषणे झाली.
व्यवस्थापिका माधुरी खटावकर यांनी आभार मानले. यावेळी संचालक राजेंद्र आडुळरकर, प्रसन्ना रेवनावर, जयपाल ठकाई, सदाशिव कोळी हे उपस्थित होते. सुरुवातीला दिवंगतांना श्रद्धांजली वाहण्यात आली.