चिकोडी : मतदान हा संविधानाने दिलेला आपला हक्क असून सर्वानी कोणत्याही आमिषाला बळी पडता आपला हक्क बजावावा. कमी मतदान होत असलेल्या पाfरसरात मतदान जागृती रॅली काढण्यात येत आहे. जास्तीत जास्त मतदान करुन लोकशाहि बळकट करावी, असे आवाहन निवडणूक अधिकारी माधव गीत्ते यांनी केले.
जिल्हा प्रशासन, जिल्हा पंचायत, जिल्हा स्वीप कमीटी, तालुका प्रशासन, तालुका पंचायत, तालुका स्वीप कमीटी, नगरसभा चिकोडी यांच्या सहयोगाने शहरात निवडणूक विभागाच्या सूनचेनुसार आमची वाटचाल मतदानकेंद्राकडे हा मतदान जागृती उपक्रम साजरा करण्यात आला. यावेळी मतदान जागृती स्टिकर, भीत्ताr पत्रकांचे, करपत्रांचे अनावरण व वितरण केले. चिकोडी येथील सकाळी 8 वाजता राजीव नगर, हुडको कॉलनी येथील सरकारी प्राथकि शाळेतील सखी मतदान केंद्रावर चिकोडी-सदलगा विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक अधिकारी माधव गीत्ते यांच्या प्रमुख उपस्थितीत लोकशाहि उत्सव मतदान 10 मे ध्येय ध्वज ध्वजरोहण करण्यात आले.