ब्रिटनच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत लिझ ट्रस आघाडीवर
वृत्तसंस्था/ लंडन
ब्रिटनच्या पंतप्रधानपदी विराजमान होण्याचे ऋषी सुनक यांचे स्वप्न अधुरे राहण्याची शक्मयता आहे. हुजूर पक्षाच्या अंतर्गत स्पर्धेमध्ये ते आता मागे पडल्याचे दिसून येत आहे. त्यांच्याऐवजी ब्रिटनच्या परराष्ट्रमंत्री लिझ ट्रस यांना अधिक लोकप्रियता लाभल्याचे दिसून येत आहे. त्यांची ब्रिटनच्या पंतप्रधानपदी निवड होण्याची शक्मयता 90 टक्के असल्याचे तज्ञांचे मत आहे.
माजी पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी कोरोना काळात केलेल्या पार्टीच्या आरोपामुळे त्यांच्यावर पद सोडण्याची वेळ काही दिवसांपूर्वी आली होती. त्यानंतर त्यांच्याजागी पंतप्रधानपदी विराजमान होण्यासाठी हुजूर पक्षाच्या ज्ये÷ नेत्यांमध्ये स्पर्धा सुरू झाली आहे. प्रारंभी या स्पर्धेत ऋषी सुनक हे जॉन्सन यांच्या मंत्रिमंडळातील अर्थमंत्री आणि राजकोषाचे प्रमुख आघाडीवर होते. पहिल्या पाच फेऱयांमध्ये त्यांची आघाडी टिकून होती. तथापि, नंतरच्या फेऱयांमध्ये लिझ ट्रस यांनी आघाडी घेतली असून ती निर्णायक ठरण्याची शक्मयता आहे.
कर रचना बदलण्याचे आश्वासन
लिझ ट्रस यांनी ब्रिटनचे नागरिक आणि उद्योजकांना सध्याची कर रचना अधिक सुलभ करण्याचे आश्वासन दिल्यानंतर त्यांच्या बाजूने पारडे फिरल्याचे दिसत आहे. ट्रस यांनी तत्काळ कर कमी करण्याची योजना घोषित केली. त्यामुळे हुजूर पक्षाच्या मतदारांमध्ये सकारात्मक वातावरण निर्माण होऊन ट्रस यांची लोकप्रियता वाढली. याचा परिणाम ऋषी सुनक यांच्या अभियानावर होऊन त्यांना पिछाडीवर यावे लागले, असे दिसत आहे. अजून काही फेऱया शिल्लक असल्याने अद्यापही ते स्पर्धेबाहेर गेलेले नाहीत. तथापि, त्यांच्या विजयाची शक्मयता धूसर बनली आहे.
जॉन्सन यांचा पाठिंबा ट्रस यांना
ऋषी सुनक यांनी आपला विश्वासघात केल्याचा आरोप माजी पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी प्रचार मोहिमेत केला होता. अन्य कुणालाही पंतप्रधान बनवा, पण सुनक नको, अशी टोकाची भूमिका त्यांनी घेतली होती. त्याचाही परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. दोन दिवसांपूर्वी घेण्यात आलेल्या ‘युगोव्ह’ सर्वेक्षणामध्ये ट्रस यांची आघाडी वाढल्याचे दिसून येत आहे. सुनक यांची पंतप्रधान बनण्याची शक्मयता केवळ 10 टक्के इतकी वर्तविली जात आहे.