प्रतिनिधी / बेळगाव : पावसामुळे भिंत कोसळून महिलेचा मृत्यू झाला आहे. सौंदत्ती तालुक्यातील हुलीकट्टी रविवारी पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली असून या दुर्घटनेत कुटुंबातील अन्य सात जण बचावले. सौंदत्ती पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली आहे.
गंगव्वा रामण्णा मुलीमनी ( वय 55 ) असे त्या दुर्दैवी वृद्धेचे नाव आहे. नेहमीप्रमाणे शनिवारी रात्रीचे जेवण आटोपून गंगव्वा घरातील एका भिंतीपाशी झोपली होती. रात्रभर पडलेल्या पावसामुळे गंगव्वाच्या अंगावर भिंत कोसळली. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या गंगव्वाला सुरुवातीला सौंदत्ती येथील तालुका इस्पितळात दाखल करण्यात आले.