वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारताची स्टार महिला टेबल टेनिसपटू मनिका बात्रा लढाऊ वृत्ती दाखवत येथे सुरू असलेल्या वर्ल्ड टेटे चॅम्पियनशिपमधील तिसऱ्या फेरीच्या सामन्यात प्युर्टोरिकोच्या अॅड्रियाना डायझकडून पराभूत झाली.
अतिशय रंगतदार ठरलेल्या या लढतीत मनिका बात्राला 3-4 (6-11, 12-10, 11-9, 6-11, 13-11, 9-11, 11-3) असा निसटता पराभव स्वीकारावा लागला. या पराभवामुळे एकेरीतील तिचे आव्हान शेवटच्या 32 फेरीत संपुष्टात आले. जागतिक क्रमवारीत 39 व्या स्थानावर असणारी मनिका आता महिला दुहेरीत अर्चना कामतसमवेत खेळणार आहे. शेवटच्या फेरीची त्यांची लढत जपानच्या हिना हायाता व मिमा इटो यांच्याशी होणार आहे. भारतीय खेळाडूंनी या स्पर्धेत आपला ठसा उमटवण्याचा निर्धार केला असून आंतरराष्ट्रीय स्तरावर जगातील सर्वोत्तम खेळाडूंविरुद्ध आपली गुणवत्ता दाखविण्यास सज्ज झाले आहेत.