वृत्तसंस्था/ लंडन
प्रीमियर लीग फुटबॉल स्पर्धेसाठी मालीचा आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटू येवेस बिस्सोमाने टॉटनहम हॉटस्पर फुटबॉल क्लबने नुकताच नवा करार केला. यापूर्वी बिस्सोमा ब्रिटॉन आणि होवे अल्बियन क्लबचे प्रतिनिधीत्व करीत होता.
मध्यफळीत खेळणाऱया बिस्सोमाने मॅजेस्टीक एससी क्लबपासून फुटबॉल कारकीर्दीला प्रारंभ केला होता. 2016 मार्चमध्ये रियल बेमाको क्लबचे प्रतिनिधीत्व केल्यानंतर तो फ्रान्समध्ये लिली ओएससी क्लबमध्ये दाखल झाला होता. 2018 जुलैमध्ये तो ब्रिटॉन क्लबशी करारबद्ध झाला होता. बिस्सोमाने टॉटनहम हॉटस्पर क्लबशी 2026 पर्यंत करार केला आहे.