48 जणांना डिस्चार्ज : 2,269 जण कोरोना मुक्त : सक्रिय रुग्णसंख्या 1133
प्रतिनिधी / सिंधुदुर्गनगरी:
जिल्हय़ात कोरोना बाधित रुग्ण वाढतच आहेत. शुक्रवारी आणखी 77 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून दोन रुग्णांचा मृत्यू झाला, तर 48 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला, अशी माहिती जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी दिली.
कोरोनाबाधित रुग्णसंख्या 3 हजार 473 झाली आहे. तर आतापर्यंत 71 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. एकूण 2 हजार 269 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्हय़ात 1 हजार 133 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धनंजय चाकूरकर यांनी दिली.
आणखी दहा महागडी इंजेक्शन्स उपलब्ध
कोरोनाच्या गंभीर रुग्णांना इंजेक्शन देण्यासाठी रेमडेसिवीरची 500 इंजेक्शन्स उपलब्ध झाली. त्यानंतर आता अतिशय महागडय़ा असलेल्या (एका इंजेक्शनची किंमत 40 हजार रु.) टॉक्झिमॅपची दहा इंजेक्शन्स जिल्हा रुग्णालयाकडे उपलब्ध झाली आहेत, अशी माहिती आमदार वैभव नाईक यांनी दिली. तसेच कोरोना बाधित झालेले जिल्हा रुग्णालयातील डॉक्टर, नर्स आता बरे होऊन पुन्हा सेवेत रुजू होत आहेत. त्यामुळे जिल्हा रुग्णालयात अजून चांगली सेवा रुग्णांना मिळणार आहे. जेवण, स्वच्छता यामध्येही सुधारणा झाल्याचे त्यांनी सांगितले.
तपासण्यात आलेले एकूण नमुने 24238
आतापर्यंतचे एकूण पॉझिटिव्ह नमुने 3473
आतापर्यंतचे एकूण निगेटिव्ह नमुने 20622
अहवाल प्राप्त न झालेले नमुने 143
सद्यस्थितीत जिल्हय़ातील सक्रिय रुग्ण 1133
मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 71
डिस्चार्ज देण्यात आलेले रुग्ण 2269
गृह व शासकीय संस्थात्मक अलगीकरणातील व्यक्ती 4832
नागरी क्षेत्रातील संस्थात्मक अलगीकरणातील व्यक्ती 12902