ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनचे प्रमुख खासदार असदुद्दीन ओवैस यांनी आणखीन 6 उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. यातील 5 मुस्लीम तर एक हिंदू उमेदवार आहे. एआयएमआयएमने उत्तरप्रदेश निवडणुकीसाठी स्वतःच्या उमेदवारांची पाचवी यादी जाहीर केली असून यात बिजनौरमधील नगीना राखीव मतदारसंघात ललिता कुमारी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मुरादाबाद येथील बिलारी मतदारसंघात खालिद जमा यांना तिकीट देण्यात आले. संभलमध्ये मुशीर तरीन, असमोली मतदारसंघात शकील अशरफी, देवबंदमध्ये मौलाना उमर मदनी आणि बरहापूरमध्ये मोइनुद्दीन यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. नगीना मतदारसंघ हा राखीव असल्याने ललिता कुमारी यांचे पती इफ्तिखार चौधरी यांना उमेदवारी मिळविणे अशक्य होते. परंतु त्यांच्या पत्नी अनुसूचित जातीशी संबंधित असल्याने त्यांना ही उमेदवारी देण्यात आली आहे. या मतदारसंघात मागील निवडणुकीत सप उमेदवार मनोज कुमार पारस यांनी विजय मिळविला होता.
Previous Articleकर्णधाराची ‘उंची’ वर्ल्डकप जिंकण्यावरुन मोजू नये
Next Article आदिवासी जमातींची श्रीमंती
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.