प्रतिनिधी / म्हापसा
म्हापसा करासवाडा येथे असलेल्या श्री गणेश रायकर स्वीटमार्ट या मिठाई दुकानाला आज रात्री शॉर्ट सर्कीटमुळे आग लागून या आगीत रोख रु. 40 हजार व इतर मिठाई आदी सामान मिळून 5 लाख रुपयांचे नुकसान झाले. आगीने मोठे पेट घेतल्याने आगीचे लोळ बाहेर पडत होते. अखेर अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन तासाभराच्या अवधीत ही आग आटोक्यात आणली.
या मिठाईचे दुकान मालक परम देवासी यांनी दिलेल्या माहितीनुसार ही आग रात्री 12.30 वाजण्याच्या दरम्यान लागली. आम्ही घरी होतो रात्री 2 वा. घटनास्थळी पोचल्यावर सर्व दुकान जळून खाक झाले होते. या आगीत सर्व मिठाई, छप्पर, रोख रुपये 40 हजार आदी सामान मिळून 5 लाखाचे नुकसान झाल्याचे त्यांनी सांगितले.