तवसाळ/ वार्ताहर
पाण्याच्या खोलीचा व प्रवाहाचा अंदाज न आल्याने मासे पकडण्यासाठी गेलेल्या सहाजणांपैकी दोघे जण बुडाल्याची घटना घडली. संतोष तुकाराम पिंपळे (वय 45) व संजय भिकू गुरव (42) अशी या दोघांची नावे आहेत. रत्नागिरी तालुक्यातील चाफेरी गावातील गुरववाडी येथील ही घटना घडली.
याबाबत अधिक माहिती अशी की, ५ पुरुष व १ महिला असे ६ ग्रामस्थ कासारी बंधारा येथे मासे पकडण्यास गेले होते. यावेळी मासे पकडत असतानाच पाण्याच्या खोलीचा व प्रवाहाचा अंदाज न आल्याने या ६ जणांपैकी दोघेजण बुडून बेपत्ता झाले. त्यातील संजय गुरव यांचा मृतदेह सापडला असून संतोष पिंपळे याचा मृतदेह अद्याप मिळून आलेला नाही.
जयगड ग्रामीण पोलीस स्थानकाचे ए.पी.आय.के.बी.भोये घटनास्थळी दाखल झाले असून बेपत्ता ईसमाचा शोध सुरू आहे.