प्रतिनिधी /कुडचडे
कुडचडे येथील श्री सातेरी युवा मंडळ व व्हायब्रंट कुडचडे अमित पाटकर इनिशिएटिव्ह यांच्या संयुक्त विद्यमाने दीपोत्सव, 2021 या कार्यक्रमाच्या अंतर्गत बुधवार 17 व गुरुवार 18 रोजी कुडचडे रवींद्र भवनमध्ये विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाच्या पहिल्या दिवशी रांगोळी स्पर्धा, हार गुंफणे स्पर्धा, फुलांची वेणी स्पर्धा, फुगडी स्पर्धा व समूह नृत्यस्पर्धेचे आयोजन केले आहे. तसेच दुसऱया दिवशी वेशभूषा स्पर्धा, पाककला स्पर्धा, मेंदी स्पर्धा, आकाशकंदील स्पर्धा आणि ‘कुडचडे सौ. व श्री.’ यांचे आयोजन करण्यात आले आहे. सदर सर्व स्पर्धा कुडचडे मतदारसंघापुरत्या असून यात विजेत्यांना आकर्षक बक्षिसे देण्यात येतील. अधिक माहितीसाठी 9823526839 वर संपर्क साधावा, अशी माहिती आयोजकांनी पत्रकार परिषदेत दिली