प्रतिनिधी / बेंगळूर
इंजिनियरिंग शिक्षण घेणाऱया विद्यार्थ्याने कॉलेज इमारतीच्या सातव्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या केली. बेंगळूर इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी कॉलेजमध्ये सोमवारी ही घटना घडली. जयंत रेड्डी असे आत्महत्या पेलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. मानसिक तणावातून जयंतने आत्महत्या केली असावी, असे सांगण्यात आले आहे.
सोमवारी दुपारी बेंगळूर इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी कॉलेजच्या इमारतीवरून उडी घेऊन जयंत रेड्डी याने आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच व्ही. व्ही. पुरम पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. जयंत हा इंजिनियरिंगच्या दुसऱया वर्षात शिकत होता. आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, मानसिक तणावातून त्याने जीवनयात्रा संपविली असावी, अशी शंका व्यक्त करण्यात आली आहे. शुल्क किंवा परीक्षेच्या मुद्दय़ावरून जयंतने हे कृत्य केले आहे का?, याचाही तपास पोलीस करत आहेत.