भारतातील श्रीमंत भिकाऱयांची यादी प्रसिद्ध
काही असे भिकारी आहेत, ज्यांचे उत्पन्न ऐकून थक्कच व्हायला होते आणि बहुधा त्यांचे उत्पन्न तुमच्यापेक्षाही अधिक असू शकते. भारतातील 5 सर्वाधिक श्रीमंत भिकाऱयांकडे स्वतःचे अपार्टमेंट तसेच चांगला बँक बॅलन्स (बँक खात्यातील रक्कम) आहे. पण तरीही ते रस्त्यांवर भीक मागताना दिसून येतात.
सर्वात श्रीमंत भिकाऱयांच्या यादीत पहिले नाव मुंबईच्या परळ क्षेत्रात भीक मागणाऱया भरत जैन यांचे आहे. त्यांच्याकडे मुंबईत दोन फ्लॅट असून त्यांचे अनुमानित मूल्य 1 कोटी 40 लाख रुपये आहे. भरत जैन हे महिन्याला भीक मागून सुमारे 75 हजार रुपये कमवतात.
श्रीमंत भिकाऱयांच्या यादीत दुसऱया स्थानावर कोलकात्यातील लक्ष्मी आहेत. वयाच्या 16 व्या वर्षापासूनच त्यांनी भीक मागण्यास सुरुवात केली होती. 1964 पासून आतापर्यंत त्यांनी भीक मागून लाखोंची मालमत्ता जमविली आहे. सद्यकाळात लक्ष्मी प्रतिदिन 1 हजार रुपये भीक मागून कमावतात.
श्रीमंत भिकाऱयांच्या यादीत मुंबईत राहणाऱया गीता तिसऱया स्थानावर आहे. मुंबईच्या चरनी रोडनजीक भीग मागून त्यांनी मुंबईत एक फ्लॅट विकत घेतला आहे. त्यांची प्रतिदिन कमाई सुमारे 1500 रुपये आहे.
बिहारची राजधानी पाटण्याच्या प्लॅटफॉर्मवर भीक मागणारे पप्पूही श्रीमंत भिकाऱयांच्या यादीत सामील आहेत. एका दुर्घटनेत पप्पू यांनी स्वतःचा पाय गमावला होता. ज्यानंतर त्यांनी रेल्वेस्थानकावर भीक मागणे सुरू केले होते. पप्पू यांच्याकडे सुमारे 1.25 कोटींची मालमत्ता आहे.