ऑनलाईन टीम / बीजिंग :
चीनमध्ये कोरोनाची दुसरी लाट सुरू झाली असून, बीजिंगमध्ये 5 लाख लोक घरात बंदिस्त असल्याची माहिती समोर आली आहे.
बीजिंगच्या जवळच्या भागात कोरोना विषाणूच्या संसर्गाची स्थिती अद्याप गंभीर आहे. त्यामुळे बीजिंगपासून दीडशे किलोमीटर अंतरावर असलेल्या अंशिन काउंटी भागाला सील करण्यात आले आहे. तसेच घाऊक बाजार आणि सार्वजनिक वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे.
आरोग्य अधिका-यांना कोरोना विषाणूची काही नवीन क्लस्टर्स आढळली आहेत. त्यानुसार खबरदारीचा उपाय म्हणून चीन सरकारने बीजिंगमधील काही भाग सील केला आहे.