आठ जणांवर एफआयआर, चार महिलांचाही समावेश
प्रतिनिधी/ बेळगाव
क्वारंटाईनमधील संशयितांचे स्वॅब घेण्यासाठी मरणहोळ (ता. बेळगाव) येथे गेलेल्या कोरोना योद्धय़ांवर हल्ला केल्याच्या आरोपावरुन काकती पोलीस स्थानकात चार महिलांसह आठ जणांवर एफआयआर दाखल करण्यात आला असून शुक्रवारी रात्री उशीरा एका वृद्धाला अटक करण्यात आली आहे. काकती पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
लक्ष्मण भरमा पाटील (वय 59, रा. मरणहोळ) असे त्याचे नाव आहे. काकतीचे पोलीस निरीक्षक श्रीशैल कौजलगी व त्यांच्या सहकाऱयांनी ही कारवाई केली. त्याच्यावर भा.दं.वि. 143, 323, 332, 341, 353, 504, 506 सहकलम 149 अन्वये एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
शुक्रवारी रात्री उशीरा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये त्याची वैद्यकीय तपासणी करुन त्याला न्यायालयासमोर हजर करण्यात आले. दगडफेक, मारहाण करणाऱयांमध्ये चार महिलांचाही समावेश आहे. 8 पैकी चौघे जण सध्या क्वारंटाईनमध्ये आहेत. तर एका वृद्धाला अटक झाली आहे. आणखी तिघे जण फरारी आहेत. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
मारहाणीत न्यू वंटमुरी ग्रामपंचायतीचे पीडीओ प्रशांत यल्लाप्पा मुनवळ्ळी (वय 37) व तलाठी प्रशांत दान्नाप्पा नेसर्गी (वय 32) हे दोघे जण जखमी झाले आहेत. त्यांच्यावर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात आले. पीडीओ प्रशांत मुनवळ्ळी यांनी काकती पोलीस स्थानकात फिर्याद दिली आहे.
मरणहोळ येथील लक्ष्मण पाटील, लक्ष्मण गावडे, अक्कप्पा पाटील, गंगुबाई पाटील, संतुराम पाटील, रेणुका पाटील, रत्नाबाई पाटील, राणी गावडे या आठ जणांवर एफआयआर दाखल झाला आहे. अचानक झालेला हल्ला व दगडफेकीमुळे स्वॅब घेण्यासाठी गेलेले आरोग्य विभागाचे कर्मचारीही हबकून गेले होते. तर पीडीओचे कपडे फाडण्यात आले आहेत. तलाठय़ाचा मोबाईल फोडण्यात आला आहे.
कोरोनासारख्या जागतिक महामारीचा सामना करताना पोलीस, वैद्यकीय कर्मचारी, महसूल विभागातील अधिकारी आपला जीव धोक्मयात घालून रुग्णसेवा करत आहेत. अशा परिस्थितीत त्यांच्यावर हल्ला करण्याचे प्रकार किती योग्य आहे? असा सवाल उपस्थित केला जात आहे.