संजय लीला भन्साळी यांच्या जन्मदिनी गंगुबाई काठियावाडी हा चित्रपट प्रदर्शित होणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. बहुप्रतीक्षित असणार हा चित्रपट 30 जुलै रोजी चित्रपटगृहांमध्ये झळकणार आहे. भन्साळी प्रॉडक्शन्सने समाजमाध्यमांद्वारे चित्रपटाचे नवे पोस्टर प्रसिद्ध करत प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे. चित्रपटाचा टीझर प्रदशिंत करण्यात आला आहे.
पोस्टरमध्ये अभिनेत्री आलिया भट्ट गंगूबाईच्या व्यक्तिरेखेत दिसून येत आहे. या पोस्टरमध्ये गंगूबाईची दिसून येणारी व्यक्तिरेखा अत्यंत बिनधास्त असल्याचे जाणवते. संजय लीला भन्साळी यांनी दिग्दर्शित केलेला हा 10 चित्रपट आहे. गंगूबाई काठियावाठी हा चित्रपट हुसैन जैदी यांचे पुसतक माफिया क्वीन्सच्या एका भागावर आधारित आहे. गंगूबाई मुंबईच्या कामाठीपुरा भागात एका वेश्यालय चालवायची. चित्रपटात अजय देवगण आणि विक्रांत मेसी देखील महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.
चित्रपटात आलियाचे दोन स्पेशल डान्स नंबर असतील. चित्रपटातील गाण्याचे चित्रिकरण कामाठीपुरा दर्शविणाऱया गोरेगाव येथील सेटवर होणार आहे.