8 महिन्यांच्या मुलीसह अस्मिता कोलदियांचा प्रवास
गुजरातमध्ये राहणाऱया 29 वर्षीय अस्मिता कोलदिया यांनी कोरोना प्रतिबंधक लसीकरणात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्या 8 महिन्यांच्या मुलीला सोबत घेत गावोगावी लस टोचण्यासाठी जातात. दररोज सकाळी स्वतःच्या स्कुटीवर स्वार होत अस्मिता बाहेर पडतात, त्यांच्यासोबत 8 महिन्यांची मुलगी जियांशी देखील असते.
अस्मिता या राजकोट येथील सरधार प्राथमिक आरोग्य केंद्राच्या लोढीदा उपकेंद्रात कार्यरत आहेत. लोकांना लसीकरणाचे महत्त्व समजावून त्यांना लस घेण्यासाठी प्रेरित करतात. त्यांनी लोढीदा गावातील एका वृद्ध महिलेलाही लसीकरणासाठी तयार केले होते. तत्पूर्वी वृद्ध महिलेने लस घेण्यास वारंवार नकार दिला होता.
घरापासून शेतापर्यंत पोहोचते
अस्मिता स्वतःच्या कामाबद्दल इतक्या समर्पित आहेत, की त्या लोकांना लस देण्यासाठी त्यांच्या घरासोबत शेतांमध्येही पोहोचतात. अस्मिता बेन आणि त्यांच्यासारख्याच अनेक आरोग्य कर्मचाऱयांमुळे लसीकरणाचे कार्य अत्यंत वेगाने सुरू आहे. देशात वेगाने लसीकरणामुळे लवकरात लवकर सुरक्ष चक्र पूर्ण होतेय.
राणी लक्ष्मीबाईंशी तुलना
लोढीदा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या सामुदायिक आरोग्य अधिकाऱयाने अस्मिता यांची तुलना झाशीच्या राणी लक्ष्मीबाई यांच्याशी केली. ज्याप्रकारे झाशीच्या राणी लक्ष्मीबाई स्वतःच्या मुलाला युद्धमैदानात घेऊन गेल्या होत्या, त्याचप्रकारे अस्मिता स्वतःच्या 8 महिन्यांच्या मुलीसोबत कोरोनाविरोधी युद्धात स्वतःचे कर्तव्य पार पाडत आहेत असे त्यांनी म्हटले ाअहे.
कर्तव्याप्रति समर्पण
अस्मिता स्वतःच्या कामात स्वतःच्या तान्हुल्या मुलीला अजिबात अडथळा मानत नाहीत. कामाबद्दल समर्पण आणि मुलीवरील प्रेम यांच्यात संतुलन त्यांनी साधले आहे. याचमुळे लस देतानाही मुलगी आईसोबत दिसून येते.
6 वेळा वृद्धेने दिला होता नकार
एका वृद्ध महिलेने घरी 6 वेळा लस देण्यासाठी पोहोचलेल्या आरोग्य कर्मचाऱयांना परत पाठविले होते. अखेरीस आरोग्य अधिकारी डॉ. आली यांनी समजूत काढली आणि अस्मिता यांनीच तिला लस टोचली आहे.