दोडामार्ग/ वार्ताहर-
पंतप्रधान ग्रामीण सडक योजना व मुख्यमंत्री सडक योजना अंतर्गत सन 2015 ते 2019 पर्यंत पूर्ण झालेले रस्ते व प्रगतीपथावर असलेले रस्ते यांची क्वालिटी कंट्रोल कडून तपासणी आणि स्ट्रक्चरल ऑडिट करावे अन्यथा 15 ऑगस्टपासून आमरण उपोषण करण्याचा इशारा पं. स. सदस्य बाळा नाईक यांनी दिला आहे. यासंदर्भात त्यांनी जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांना निवेदनही पाठविलेले आहे.