जिल्हा शल्य चिकित्सकांवर अनागोंदी कारभाराचा आरोप : बदली न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा
प्रतिनिधी / सिंधुदुर्गनगरी :
जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धनंजय चाकुरकर यांच्यावर अनागोंदी कारभाराचा आरोप करीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने जिल्हा रुग्णालयासमोर सोमवारी जनआक्रोश आंदोलन करण्यात आले. डॉ. चाकुरकर यांची बदली न झाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशाराही मनसे नेते व माजी आमदार परशुराम उपरकर यांनी यावेळी दिला. यावेळी डॉ. चाकुरकर यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
जिल्हा रुग्णालयातील कोरोना बाधित रुग्णांना चांगले जेवण मिळत नाही, स्वच्छता केली जात नाही, टॉयलेट, बाथरुमला दरवाजे नाहीत, इमारतींना गळती आहे, कोरोना चाचणी अहवाल येण्यापूर्वीच रुग्णांना सोडले जाते, अशी गंभीर स्थिती असून याला जिल्हा शल्य चिकित्सक जबाबदार आहेत. वेगवेगळ्य़ा खरेदीमध्येही भ्रष्टाचार करण्यात आला आहे. या अनागोंदी कारभाराविरोधात जनआक्रोश आंदोलन सुरू करण्यात आले आहे. जोपर्यंत कारभार सुधारत नाही, तोपर्यंत यापुढेही आंदोलने केली जातील, असे जाहीर करण्यात आले.
जिल्हा रुग्णालयात कर्मचारी भरती करावी, डॉक्टर व नर्स दिवसरात्र काम करतात. त्यांना आठवडय़ातून एक तरी सुट्टी द्यावी. 12 ते 18 वर्षे एकाच ठिकाणी असणाऱया कर्मचाऱयांची बदली करावी. जिल्हा रुग्णालयात सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, अशा विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या. तसेच डॉक्टरांच्या बदल्या करताना मोठा गैरव्यवहार केला जातो. झाडू खरेदीमध्ये भ्रष्टाचार आहे. साफसफाई कंत्राटामध्ये गैरव्यवहार करण्यात आला आहे. त्यामुळे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. चाकुरकर यांची बदली झालीच पाहिजे. तसेच चौकशी होऊन कारवाई झाली पाहिजे अन्यथा संपूर्ण जिल्हाभर तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला.
मनसेच्या या आंदोलनाची दखल कोल्हापूर आरोग्य विभागाच्या प्रभारी उपसंचालक डॉ. यू. आर. माने यांनी घेत 24 सप्टेंबरला सिंधुदुर्गात येऊन सर्व विषयांवर चर्चा करण्याचे लेखी आश्वासन दिले. त्यानंतर सायंकाळी आंदोलन स्थगित करण्यात आले.
उपरकर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या आंदोलनात जिल्हाध्यक्ष राजन दाभोळकर, कुणाल किनळेकर, उपाध्यक्ष दया मेस्त्राr, कुडाळ तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे, दीपक गावडे, विनोद सांडव, गुरुदास गवंडे, चंदन मेस्त्राr, सचिन तावडे, नंदू घाडी, आप्पा मांजरेकर आदींसह मनसेचे कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते. पोलीस बंदोबस्तही मोठय़ा प्रमाणात होता.
प्रतिक्रिया देण्यास डॉ. चाकुरकर यांचा नकार
या आंदोलनावर कोणतीही प्रतिक्रिया देण्यास डॉ. चाकुरकर यांनी नकार दिला.
मानाचा मुजरा फलक ठरला लक्षवेधी
मनसेच्यावतीने जिल्हा रुग्णालयासमोर जनआक्रोश आंदोलन झाले. त्याच्या समोरच कणकवली येथील ज्येष्ठ नागरिक पारकर यांनी एक मोठे होर्डिंग लावले आहे. ‘सिंधुदुर्ग जिल्हय़ातील कोरोनाग्रस्त रुग्णांना कोरोनामुक्त करणाऱया जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. चाकुरकर, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील आणि फिजिशियन डॉ. नागेश पवार या देवदुतांना मानाचा मुजरा’ असे हे होर्डिंग आहे. एकीकडे आंदोलन सुरू असताना दुसरीकडे लावलेला हे होर्डिंग लक्षवेधी ठरत होते.