बेंगळूर/प्रतिनिधी
नारकोटिक ड्रग्स अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्स (एनडीपीएस) कायद्यांतर्गत दाखल केलेल्या खटल्यांबाबत काम करणार्या विशेष कोर्टाने सोमवारी अभिनेत्री रागिनी द्विवेदी आणि संजना गलराणी यांची जामीन याचिका फेटाळून लावली, त्यांना ड्रग पेडलिंग प्रकरणी अन्य अभिनेतांचा समावेश असल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती.
संजना गलराणी यांना १६ सप्टेंबर रोजी न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती, तर द्विवेदी यांना १४ सप्टेंबर रोजी तुरुंगात पाठविण्यात आले होते. त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे, त्यामध्ये सेलिब्रिटी पार्टीचा संयोजक वीरेन खन्ना, व्यवसाय विश्लेषक आदित्य अग्रवाल, वैभव जैन, प्रितीक शेट्टी यांचा समावेश आहे. तर आरटीओ लिपिक बी. के. रविशंकर याला या प्रकरणी निलंबित केले. कोर्टाने जामीन अर्ज फेटाळल्यामुळे त्यांना बेंगळूर येथील परप्पन अग्रहरा मध्यवर्ती कारागृहात दाखल करण्यात आले.