ऑनलाईन टीम / मुंबई :
मुंबई क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात मुख्य साक्षीदार बनलेल्या किरण गोसावीने आर्यन खानच्या सुटकेसाठी शाहरूखकडे 25 कोटींची मागणी केली होती. ही डील 18 कोटींना सेटल होणार होती. यामधील 8 कोटी एनसीबी अधिकाऱ्यांना देण्यात येणार असल्याचा धक्कादायक खुलासा किरण गोसावीचा बॉडीगार्ड प्रभाकर साईल याने केला आहे.
किरण गोसावी हा जो व्यक्ती आहे ज्याचा फोटो आर्यन खानसोबत व्हायरल झाला आहे. प्रभारकरने म्हटले आहे की, गोसावीला 25 कोटींबद्दल बोलताना ऐकलं होतं ते डील 18 कोटींमध्ये फायनल झाले होते. त्यामधील 8 कोटी रुपये एनसीबीच्या अधिकाऱ्यांना द्यायचे आहेत, असे त्यांच्यात बोलणे सुरू होते. या संवादात शाहरुखची मॅनेजर पूजा दादलानीकडून पैसे घेण्याचा उल्लेख होता. क्रूझवर छापा टाकल्यानंतर शाहरुख खानची मॅनेजर पूजा ददलानी आणि किरण गोसावीला 15 मिनिटं निळय़ा रंगाच्या मर्सिडीज कारमध्ये एकत्र बोलताना पाहिलं असल्याचा दावाही प्रभाकरनं केला आहे.
दरम्यान, एनसीबीने किरण गोसावीच्या कोऱया कागदांवर सह्या घेतल्या आहेत. आता किरण गोसावी गायब झाल्यापासून आपल्याला एनसीबीकडून धोका असल्याचे प्रभाकर सईदने म्हटले आहे.