साटेली भेडशी / प्रतिनिधी:
सार्वजनिक बांधकाम विभागाकडून दोडामार्ग ते बांदा व दोडामार्ग ते विजघर राज्यमार्गावरील खड्डे बुजवण्याचे काम सुरू झाले असून हे काम करत असताना दोडामार्ग ते बांदा रस्ता दुरुस्ती पावसाळी डांबराने तर दोडामार्ग ते विजघर दुरुस्ती जांभ्या दगडाने करीत असून हा दुजाभाव का?- असा सवाल सामाजिक कार्यकर्ते संदेश वरक यांनी केला आहे. तर दोडामार्ग ते बांदा रस्ता दुरुस्ती पावसाळी डांबराप्रमाणे करीत आहेत तशाचप्रकारे दोडामार्ग ते विजघर रस्त्याची दुरुस्ती जांभ्या दगडाने न करता पावसाळी डांबराने दुरुस्ती करावी न केल्यास काम करू देणार नाही असा इशारा श्री.वरक यांनी दिला आहे.