वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
ग्राहकोपयोगी इलेक्ट्रॉनिक्स वस्तुंसह वाहने, पोलाद यांच्या किमती नव्या वर्षात वाढण्याचे संकेत व्यक्त केले जात आहेत. या क्षेत्रातील कंपन्यांनी यावर्षी 3 ते 5 टक्के किंमती वाढवलेल्या आहेत. पुढील महिन्यापासून 6 ते 10 टक्के इतक्या किमती पुन्हा विविध वस्तुंच्या वाढणार आहेत.
पुढील तीन महिन्याच्या कालावधीत किंमती टप्प्याटप्प्याने वाढवल्या जाणार आहेत. डाबर, हिंदुस्थान युनिलिव्हर, ब्रिटानिया आणि मॅरिको यांच्यासह इतर कंपन्यांनी 5 ते 12 टक्के किंमती गेल्या 6 महिन्यात वाढवल्या आहेत. ऑटो क्षेत्रातील कंपन्या दुचाकी, चारचाकींच्या किंमती वाढवणार आहेत. मारूती, टाटा मोटर्स, महिंद्रा आणि महिंद्रा, स्कोडा व टोयोटा यांच्यासह हिरो मोटो यांनी आधीच किंमती वाढवल्या आहेत. 1 जानेवारीपासून पुन्हा विविध वाहनांच्या किंमती वधारणार आहेत. याचप्रमाणे लॉजिस्टीक्स कंपन्यादेखील वाहतुक शुल्कात वाढ करणार आहेत. पोलादाच्या किंमतीही गेल्या काही महिन्यात वाढल्या आहेत. पण अलीकडे किंमती स्थिर राहिल्या आहेत. स्टीलसह तांबे व ऍल्युमिनीयमच्या किंमतीदेखील वाढल्या.
अंतर्गत खर्चात होणारी वाढ कंपन्यांना आपल्या उत्पादनांच्या किंमती वाढवण्यासाठी कारणीभूत ठरत आहेत. कच्चे तेल, पाम तेल व पॅकेजिंगचा खर्च दुप्पटीने वाढला आहे. परिणामी उत्पादनावर खर्च वाढल्याने कंपन्यांनी उत्पादनांच्या किंमती येणाऱया काळात वाढवण्याचे सुतोवाच केले आहे.