गोवा कला महाविद्यालयाच्या अध्यापकवर्गाकडून अभीष्टचिंतन
प्रतिनिधी / पणजी
गोवा कला महाविद्यालयाची ओळख अधोरेखित करण्याचे महत्कार्य आजपर्यंत अगदी निःस्वार्थीपणे व प्रसंगी कणखर भूमिकेतून साकार करणारे प्राचार्य महेश वेंगुर्लेकर नुकतेच सेवानिवृत्त झाले असून, त्यानिमित्ताने त्यांचा त्या महाविद्यालयातील संपूर्ण अध्यापकवर्ग आणि शिक्षकेतर कर्मचाऱयांच्?या वतीने सत्कार समारंभ व निरोप देण्याचा कार्यक्रम अलीकडेच महाविद्यालयात पार पडला.
कॉलेजचे प्रभारी प्राचार्य राजीव शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमाला महाविद्यालयाच्या दोन्ही विभागांतील सर्व प्राध्यापक तसेच सर्व शिक्षकेतर कर्मचारी आवर्जून उपस्थित होते. या प्रसंगी वेंगुर्लेकरसरांसोबतच्या जुन्या आठवणी आणि अनुभव यांना उजाळा देत अनेक सहकाऱयांनी स्वतःचे मनोगत व्यक्त करून त्यांच्या पुढील आयुष्यासाठी सदिच्छा दिल्या. तसेच, सर्वांच्या वतीने शाल-श्रीफळ आणि भेटवस्तू सन्मानपूर्वक देऊन सत्कार करण्यात आला. यासंदर्भातील वैशिष्टय़ म्हणजे वेंगुर्लेकर यांच्या वीस वर्षांच्या प्राचार्यपदाच्या कारकीर्दीसाठी विविधरंगी वीस गुलाबांचा विशेष पुष्पगुच्छही भेट देण्यात आला.
या कार्यक्रमात कॉलेजमधील मास्टर ऑफ फाइन आर्ट विभागाचे उपयोजित कला शाखाप्रमुख विल्प्रेड गोयश, त्याच विभागाच्या पेंटिंग शाखा प्रमुख हर्षा मंडूरकर, बी.एफ.ए. उपयोजित कला विभागाच्या प्रा. सबिता प्रभुदेसाई, प्रा. समीर गोवेकर, प्रा. सागर गावडे, अतिथी प्राध्यापक महेंद्र चोडणकर व प्रणाली नाईक-गावणेकर, प्रमुख कारकून कमलाकर नाईक, अव्वल कारकून नरेश चव्हाण इत्यादींनी मनोगत व्यक्त केले.
या प्रसंगी मनोगत मांडताना श्री. वेंगुर्लेकर यांनी स्वतःच्या एकूणच कार्यकाळाचा थोडक्मयात आढावा घेतला. अनेक प्रसंग आणि आठवणींना उजाळा देतानाच स्वतःच्या सेवाकाळात प्रत्यक्ष-अप्रत्यफक्षरीत्या सहकार्य करणाऱया प्रत्येक घटकाचा नामोल्लेख करीत कृतज्ञताही व्यक्त केली. यात विशेषतः राज्य सरकार, मुख्यमंत्री, तांत्रिक शिक्षण संचालक, ए.आय्.सी.टी.ई. दिल्ली व विभागीय कार्यालय मुंबई, गोवा विद्यापीठ तसेच अनेक मान्यवरांचेही आभार मानले. विशेषतः प्राचार्यपदाच्या कार्यकाळात महाविद्यालयाच्या एकूणच प्रगतीसंदर्भात स्वतः दिलेले योगदान, महाविद्यालयात मास्टर ऑफ फाइन आर्ट हा पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू करण्याच्या बाबतीतील बरे-वाईट अनुभवही त्यांनी स्वतःच्या मनोगतातून व्यक्त केले.
श्री. वेंगुर्लेकर यांनी अनेक सरकारी आणि शैक्षणिक संस्था?वर महत्त्वाचे पदाधिकारी म्हणून कार्यभार सांभाळलेला आहे. नवी दिल्ली आणि मुंबईतील ए.आय.सी.टी.ई., गोवा विद्यापीठात ’फॅकल्टी डीन’ म्हणून अनेक वर्षे पदभार, इतर शैक्षणिक समित्यांवर पदाधिकारी म्हणून कार्य, गोवा सरकारच्या अनेक समित्यांमध्ये सदस्य म्हणून त्यांची झालेली नियुक्ती इत्यादींचा त्या प्रामुख्याने समावेश आहे.
नेत्रदीपक कार्याबद्दल सहकाऱयांकडून कौतुक!
प्राचार्य वेंगुर्लेकर यांनी नेत्रदीपक कार्य केल्याचे नमूद करून त्याबद्दल कौतुक करून त्यांचे सहकारी म्हणाले, सध्या गोवा हे एज्युकेशन हब बनवण्याच्या दृष्टीने मोठय़ा प्रमाणावर सरकारतर्फे पावले उचलली जात आहेत. आज गोव्यातील अनेक नामांकित शैक्षणिक संस्था?चा यात सहभाग आहे. अशा नामांकित शैक्षणिक संस्था?मध्ये गोवा कला महाविद्यालायाचे नाव आज अग्रक्रमाने घेतले जाते. गेल्या अनेक वर्षांपासून फाइन आर्टमधील पदवी अभ्यासक्रमासोबतच पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी सर्व स्तरांवर प्रयत्न सुरू होते. त्?या प्रयत्नांना यश येऊन विद्यमान शैक्षणिक वर्षापासून मास्टर ऑफ फाइन आर्ट या पदव्युत्तर अभ्यासक्रमाचा प्रारंभ झाला आहे. गोव्यातील कलाकार, विद्यार्थ्यांची कित्येक वर्षांची प्रलंबित असलेली ही मागणी पूर्णत्वास नेण्यात राज्य व केंद्र सरकार तसेच विविध संबंधित पातळय़ांवर वारंवार आवश्यक तो पाठपुरावा करण्याचे कार्य उत्तम रीतीने पार पाडणारा मुख्य दुवा म्हणजेच प्राचार्य वेंगुर्लेकर हे होय. प्राचार्यपदाची धुरा गेली वीस वर्षे यशस्वीपणे सांभाळत, अनेक प्रतिकूल परिस्थितीमधून सर्व बाबींचा समतोल साधत त्यांनी हे कार्य केले आहे.