दिल्ली येथे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते पुरस्काराचा केला स्वीकार
प्रतिनिधी/ सातारा
साताऱयाची शिखरकन्या ऐव्हरेस्ट कन्या म्हणून ओळखल्या जातात त्या प्रियांका मोहिते यांचा आज भारत सरकारच्यावतीने क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च असा तेनसिंग नोर्गे राष्ट्रीय साहस पुरस्कार 2021 ने दिल्ली येथे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. त्यांचा हा सन्मानसोहळा सातारकरांनी दुरचित्रवाहिनीवरुन याची देही याची डोळा पाहिला अन् साताऱयाच्या लेकीचा कौतुक डोळय़ात साठवून ठेवले.
प्रियांका यांना गिर्यारोहण या प्रचंड साहसी क्रीडा प्रकारातील सातत्यपूर्ण यशस्वी कामगिरींसाठी हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या सोहळय़ाला त्यांच्या मातोश्री शोभा मंगेश मोहिते या उपस्थित होत्या. दिल्ली येथे प्रियांका यांचा राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. प्रियांका यांचा पर्वतीय साहसाला कारणीभूत ठरलेला गिरीदुर्गराज सह्याद्री, मराठी माणसातील प्रखर जिद्द आणि साहसाचा महाराष्ट्राचाही अभिमान आहे. गिर्यारोहणातील विशेष उल्लेखनिय कामगिरीकरीता महाराष्ट्र शासनाचा सर्वोच्च असा शिवछत्रपती क्रीडापुरस्कार 2019 साली मिळाला आहे. जगातील 14 अष्टहजारी हिमशिखरांपैकी 4 हिमशिखरांवर निर्विवाद आणि निर्भेळ यश मिळवणारी प्रियांका या पहिल्या महाराष्ट्रीय महिला गिर्यारोहक म्हणून जगभरात सुविख्यात आहे. इतकेच नाही तर जगातील सर्वोच्च अशा माऊंटएव्हरेस्ट वर वयाच्या अवघ्या 21 व्या वर्षी मिळवलेल्या तगडय़ा यशानंतर, जगातील 4 थे अत्त्युच्च ल्होत्से (8,516 मीटर), 5वेअत्त्युच्च मकालू (8,463 मीटर) आणि 2021 मध्ये तर अत्यंत भयावह असे 10वे अत्त्युच्च अन्नपूर्णा (8,091 मीटर) या हिमशिखरांवर यशस्वीरीत्या चढाई केलेली देखील त्या पहिली भारतीय महिला गिर्यारोहक ठरल्या. त्यामुळेच तिच्या उदंड साहसाचा सन्मानपूर्ण गुणगौरव या पुरस्कारामुळे झालेला आहे. अगदी शालेय जीवनापासूनच प्रियांका यांना गिर्यारोहणी आवड आहे. त्यांच्या या साहसाचे कौतुक आज पुरस्काराने झाले.
सातारकरांच्या सोशल मीडियावर प्रियांका मोहिते यांचेच कौतुक
सातारच्या लेकीचा कौतुक सोहळा पाहण्यासाठी सातारकरांनी दुरचित्रवाणी व सोशल मीडियाचा आधार घेतला. प्रियांका मोहिते यांना शुभेच्छा संदेश देण्यात आले.