प्रतिनिधी / म्हापसा
भारतीय जनता पार्टीच्या उत्तर गोवा जिल्हा महिला मोर्चाच्या अध्यक्षपदी गीता कदम यांची बिनविरोध निवड करण्यात आली. उपाध्यक्षपदी सिद्धी प्रभू, दिक्षा देवानंद माईणकर, तारा बाबुसो हडफडकर तर सरचिटणीसपदी गौरी प्रमोद कामत यांची निवड करण्यात आली. विधा नाईक व गौरी जोशी यांची सचिवपदी निवड झाली.
भाजपा महिला अध्यक्षा शितल नाईक यांनी या नवनिर्वाचित समितीची नावे घोषित केली. यावेळी सचिव शिल्पा नाईक, कुंदा चोडणकर, व जिल्हाध्यक्ष दिक्षा कांदोळकर उपस्थित होत्या. निवडण्यात आलेले इतर सदस्य पुढीलप्रमाणेः
सदस्य- पॅन्डीडा डीसोझा, अनीता शेटगावकर, अनुपम भागवत नाईक, सिद्धी केरकर, शुष्मा नाईक, शुभदा कुंडईकर, नीशा मयेकर, दिया शेटकर, जया बागकर, शशिकला गोवेकर, दिव्या लोटलीकर, कीर्ती अस्नोडकर, दिपा मडकईकर, मार्टा डिसोझा, फातिमा रॉड्रीगीस, पूजा तारी, आरती दिनकर, अपूर्वा च्यारी, अनिशा गावडे, शुष्मा नागवेकर, अजक्षा फडते, सुप्रिया केसरकर, निलीमा शेटय़े, कु. कविता आर्लेकर, शंक्रीता देसाई.
याप्रसंगी बोलताना अध्यक्ष गीता कदम म्हणाल्या की, सर्वांना विश्वासात घेऊन आपण पुढे जाणार आहे व या निवडीबद्दल त्यांनी सर्वांचे आभार मानले.
काम करीत रहा पक्ष दखल घेणार- शीतल नाईक
भाजपमध्ये सर्वांना प्रतिनिधीत्व मिळते, जिल्हा पंचायतामध्येही महिलांना न्याय मिळाला आहे. आमच्या मागण्या आहे त्या पक्षासमोर ठेवल्या आहे, महिलांनी आपण प्रथम या पक्षात काम करावे त्यानंतरच तिकीटासाठी भांडावे. काम करीत रहा पक्ष त्या कामाची दखल घेतो असे अध्यक्ष शीतल नाईक म्हणाल्या.
सूत्रसंचालन व समितीची ओळख सचिव शिल्पा नाईक यांनी केली. यावेळी पदाधिकाऱयांना भाजपचा फेटा घालून त्यांचे स्वागत करण्यात आले.