प्रतिनिधी/ बेळगाव
महापालिकेचे अर्थसंकल्प तयार करून प्रशासकीय मंजूरी घेणे आवश्यक आहे. मात्र जानेवारी महिना संपत आला तरी अर्थसंकल्पाचा मसुदा तयार करण्यासाठी पुरक माहिती महापालिकेतील विविध विभागानी दिली नाही. यामुळे आयुक्तांनी सर्व विभागप्रमुखांची बैठक घेऊन आवश्यक माहिती तातडीने देण्याची सुचना आधिकाऱयांना केली.
वास्तविक पाहता महापालिकेचे आर्थिक अंदाजपत्रक डिसेबरमध्ये तयार करणे आवश्यक आहे. मात्र जानेवारी संपत आला तरी 2020-21 या आ&िंर्थक वर्षाचे अंदाजपत्रक तयार झाले नाही. अर्थसंकल्प तयार करून दि.15 जोनवारीपर्यत प्रशासकीय मंजूरी घेण्याची तरतूद महापालिकेच्या कायद्यात आहे. तसेच नगरविकास खात्याच्या मंजूरीसाठी फेब्रुवारी महिन्यात पाठविणे आवश्यक आहे. मात्र महापालिकेच्या विविध विभागप्रमुखांनी जमा खर्चाची माहिती तसेच अर्थसंकल्पाची माहिती लेखाविभागाला दिली नाही. यामुळे अंदाजपत्रक तयार करण्याचे काम अद्याप रखडले आहे. आर्थिक अंदाजपत्रकाची माहिती तातडीने देण्यात यावी अशी सुचना महापालिकेतील 16 विविध विभागप्रमुखांना महापालिका आयुक्तांनी आणि प्रभारी लेखाधिकाऱयांनी दिली होती. पण अद्याप पुरक माहिती दिली नसल्याने महापालिकेचे अंदाजपत्रक तयार झाले नाही. यामुळे महापालिका आयुक्त जगदीश के.एच. यांनी मंगळवारी सायंकाळी महापालिकेच्या सर्व विभागप्रमुखांची बैठक घेऊन पुरक माहिती देण्याची सुचना केली. तसेच प्रत्येक विभागाच्या अधिकाऱयांशी अर्थसंकल्पाबाबत चर्चा केल्याने रात्री उशिरापर्यत बैठक सुरू होती. आतापर्यत झालेल्या कामांचा समावेश यामध्ये करण्यात यावा अशा विविध सुचना केल्या बैठकी आयुक्तांनी केल्या. यावेळी लेखा विभागाचे अधिकारी, आरोग्य, महसुल विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि विविध विभागाचे अधिकारी बैठकीला उपस्थित होते.