प्रतिनिधी /तिसवाडी
मळार – ओल्ड गोवा येथील श्री वनदेवी मुकोबा देवस्थानच्या नूतन मूर्ती प्रतिष्ठापनेच्या 35 व्या वर्धापनदिन सोहळय़ात आज गुरुवार 17 रोजी तिसऱया दिवशी सकाळी धार्मिक विधी, रात्री 9 वाजता पावणी व नंतर ‘ना म्हणप ना’ हा कोकणी नाटय़प्रयोग सादर करण्यात येणार आहे.
श्री रवळनाथ क्रिएशन्स, करमळी प्रस्तुत आणि दीपश्री दिपेश दळवी निर्मित या नाटकाचे लेखक दिपेश दळवी असून महेंद्र पर्वतकर यांनी दिग्दर्शन केले आहे. गुरुनंद आमोणकर, विनोद शिरोडकर, महेंद्र पर्वतकर, दिपेश दळवी, प्रशांती च्यारी यांनी भूमिका साकारल्या आहेत. ध्वनी योजना सागर सावंत तर सुंदर कारबोटकर यांनी नेपथ्य व रंगभूषा करणार आहेत. सर्वांनी या नाटकाचा आनंद घ्यावा, असे आवाहन देवस्थान समितीतर्फे करण्यात आले आहे.